Beed News 
मराठवाडा

फक्त मुंडे स्मारकासाठीच फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले : खडसे

प्रा. प्रविण फुटके

परळी (जि. बीड) : देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तिसऱ्या दिवशी त्यांना राजीनामाही द्यावा लागला. याबाबत पक्षांतर्गत आणि विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचे कारण भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. फडणवीस केवळ लोकनेते गोपीनाथरा मुंडे यांच्या स्मारकासाठीच दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्याचे त्यांनी सांगितले.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासाठी आपण मंत्री असताना दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन विभागाची जागा दिली होती. त्यांच्या नावाने अपघात विमा योजनाही आपल्याच आग्रहाने कॅबीनेटमध्ये मंजूर झाली. मात्र, आपण मंत्रीपदावरुन गेल्यानंतर भाजप सरकारकडून स्मारकासाठी काहीच झाले नाही अशी थेट टीका त्यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. या स्मारकासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा ता. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्री झाले. ता. २४ नोव्हेंबरला त्यांनी जागेच्या एक्सेप्टन्सवर स्वाक्षरी केली आणि ता. २५ नोव्हेंबरला स्मारकाचे कार्यारंभ आदेश निघाल्यानंतर पुन्हा ता. २६ नोव्हेंबरला फडणवीस यांनी राजीनामा दिल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. त्यामुळे फडणवीसांनी एवढे करुनही या एका कामासाठी ते दुसऱ्यांदा आले, असा टोला लगावत त्यासाठी त्यांचे आभार मानतो, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT