sarpanch.jpg 
मराठवाडा

‘या’ ग्रामपंचायतींची रणधुमाळी झाली सुरू

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : एप्रिल २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता. २४) जाहीर केला. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम गुरुवारपासून (ता. २७) सुरू होणार असून शंभर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ता. २९ मार्च रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत सरपंचांची निवडणूक घेण्यात येणार आहे.

तेरा तालुक्यातील शंभर ग्रामपंचायती
राज्य निवडणूक आयोगाने एप्रिल २०२० ते जून २०२० मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात नांदेड तालुक्यातील २४, अर्धापूर व मुदखेड प्रत्येकी दोन, हदगाव, माहूर व देगलूर प्रत्येकी एक, हिमायतनगर पाच, बिलोली, किनवट व लोहा प्रत्येकी दहा, कंधार चार, नायगाव सहा, मुखेड २४, अशा एकूण शंभर ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 


गुरुवारी होणार नोटीस प्रसिद्ध
निवडणूक कार्यक्रमात गुरुवारी (ता. २७) तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. इच्छुकांना ता. सहा मार्च ते ता. तेरा मार्च या कालवाधीत सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत नामर्निदेशनपत्र दाखल करता येतील. नामर्निदेशनपत्रांची छाननी ता. १६ मार्च रोजी सकाळी अकरापासून होईल. ता. १८ मार्च रोजी दुपारी तीनपर्यंत नामर्निदेशनपत्र मागे घेता येतील. तीन वाजल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. आवश्यक असल्यास ता. २९ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी ता. ३० मार्च रोजी होणार असून ता. चार एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सध्या थेट सरपंचाची निवड
सध्या तरी निवडणुकीतून थेट सरपंच निवडण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यासोबतच सरपंचदाचे आरक्षणही जाहीर होणे बाकी आहे. आगामी काळात यामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळूण निघणार आहे. पक्षीय चिन्हांवर निवडणुका लढविण्यात येणार नसल्यातरी सर्वच पक्षांकडून आपले पॅनल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

निवडणूक लागलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायती
नांदेड ः ब्राम्हणवाडा, कामठा खुर्द, बोंडार तर्फे हवेली, आलेगाव, दर्यापूर, पिंपरी महिपाल, कोटतीर्थ, वाडी पुयड, वडगाव, इंजेगाव, फत्तेपूर, कांकाडी, किकी, धनगरवाडी, खुपसरवाडी, विष्णुपुरी, भनगी, कल्लाळ, पिंपळगाव निमजी, गंडेगाव, नांदुसा/भालकी, वडवणा/खडकी, तळणी, चिखली बुद्रुक.
अर्धापूर ः गणपूर व सांगवी - खडकी.
मुदखेड ः पिंपळकौठा चोर व पांढरवाडी.
हदगाव ः पिंगळी.
हिमायतनगर ः चिंर्चोडी, सवना ज., एकघरी, वाघी व महादापूर.
किनवट ः आंदबोरी इ., बोधडी बु., दहेगाव ची., गोंडेमहागाव, करंजी हुडी, कुपटी बु., लिंगी, मलकवाडी, मदनापूर ची., मलकापूर खेर्डा.
बिलोली ः खतगाव, रामतीर्थ, हुनगुंदा, किनाळा, पोखर्णी, तोरणा, चिंचाळा, रामपूर थडी, हिप्परगा माळ, केसराळी.
नायगाव ः खैरगाव - होटाळा, टाकळी तब, नावंदी, रातोळी, शेळगाव छत्री, मांडणी.
देगलूर ः तुपशेळगाव.
मुखेड ः शिरूर दबडे, कोटग्याळ, आडलूर/नंदगाव, सांगवी भादेव, गोणेगाव, चव्हाणवाडी, आखरगा, हिप्परगा दे, उंद्री पदे, सांगवी बेनक, चिवळी, बेरळी बुद्रुक, बेरळी खुर्द, धनज/जामखेड, डोरनाळी, राजुरा तांडा, मेथी खपराळ, तग्याळ, मंडलापूर, वर्ताळा, येवती, राजुरा बुद्रुक, मारजवाडी, इटग्याळ पदे.
कंधार ः बाचोटी, बोरी खुर्द, मरशिवणी, संगूची वाडी.
लोहा ः जोशी सांगवी, कामळज, जोमेगाव, बोरगाव आ., हळदव, चितळी, धानोरा म., कलंबर बुद्रुक, मुरंबी, गौडगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

SCROLL FOR NEXT