2Sakal_20News_11 
मराठवाडा

हॉटेल, दुकानांवर पडली वीज तार; वीजपुरवठा खंडित झाल्याने दुर्घटना टळली

शिवानंद भुसारे

येरोळ (जि.लातूर) : येरोळमोड येथे शनिवारी (ता.दहा) दुपारी लातूर-उदगीर मुख्य रस्त्यावर वीजपुरवठा करणारी ११ केव्हीची तार अचानक तुटून पडली. ही तार रस्त्याच्या कडेने असलेल्या हॉटेल आणि दुकानांवर पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने धोका टळला.

येरोळ वीजपुरवठा केंद्रातून चामरगा व डिगोळ गावाला वीजपुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी येरोळमोड येथे लातूर-उदगीर मुख्य रस्त्यावरून रोडच्या दक्षिण बाजूस वीज रोहित्राला वीज जोडणीतून एक लाइन चामरगा व डिगोळ दोन गावांना वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान अचानक पाऊस आला. याच वेळी उदगीरहून लातूरकडे जाणारी एसटी बस येरोळ मोडवर प्रवासी घेण्यासाठी थांबली असता मुख्य रस्त्यावरून गेलेली ११ केव्हीची वीज तार अचानक तुटून एसटी बस जवळच रस्ता, हॉटेल, दुकानांवर पडली. त्यामुळे हॉटेलमधील ग्राहक घाबरून बाहेर पडले. बस चालकानेही बस मागे घेतली. वीज तार तुटताच आपोआप वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे धोका टळला.


येरोळ मोड येथे पाऊस चालू असताना इन्सुलेटर तुटल्याने तार मुख्य रस्त्यावर तुटून पडली होती. तार तुटताच वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे धोका टळला. माहिती मिळताच वीज तारेची तत्काळ जोडणी केली.
- बी. डी. येचवाड, लाईनमन

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

Dhananjay Munde : दुष्काळ प्रश्नी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले; पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान चे दोन दोन हप्ते तातडीची मदत म्हणून वितरीत करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT