मराठवाडा

मराठवाड्यात दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागा जास्त

हरी तुगावकर

लातूर व नांदेड हे दोन्ही जिल्हे शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. यात दहावीच्या विद्यार्थ्यापेक्षा अकरावीची प्रवेश क्षमता कमी आहे.

लातूर : कोरोनामुळे या वर्षी दहावीच्या (Secondary School Certificate) सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्यात येणार आहे. मराठवाड्यात (Marathwada) दहावीच्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावी प्रवेशाच्या जागा जास्त आहेत. पण, शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या लातूर (Latur) व नांदेड (Nanded) जिल्ह्यात मात्र प्रवेशाच्या अडचणी येणार आहेत. यात शिक्षण विभाग कशा पद्धतीने मार्ग काढतो याकडे लक्ष लागले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे दहावी परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात दोन लाख ९५ हजार ३१७ विद्यार्थी पास होणार आहेत. त्यांना अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. यात मराठवाड्यात अकरावीच्या तीन लाख ३३ हजार ५५० जागा आहेत. (Eleventh Class Student Numbers High Than Tenth In Marathwada Region)

लातूर, नांदेडमध्ये अडचण

लातूर व नांदेड हे दोन्ही जिल्हे शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. यात दहावीच्या विद्यार्थ्यापेक्षा अकरावीची प्रवेश क्षमता कमी आहे. लातूर जिल्ह्यात दहावीचे ४२ हजार ५०९ विद्यार्थी असून, अकरावीची प्रवेश क्षमता ४१ हजार ४० आहे. म्हणजे एक हजार ४६९ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न आहे. तर नांदेड जिल्ह्यात ४५ हजार १७० दहावीचे विद्यार्थी असून, अकरावीच्या जागा ४० हजार ७४० आहे. त्यामुळे चार हजार ४३० विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न आहे. यात शिक्षण विभाग काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे.

नामांकित महाविद्यालयासाठी लागणार कस

दरवर्षी नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी चढाओढ असते. लातूरमध्ये तर ९७ ते ९८ टक्क्यालाच प्रवेश बंद होतात. यावर्षी मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी शंभर गुणाची सीईटी घेतली जाणार आहे. या गुणावरच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

Indian Women Cricket Team : भारतीय महिला टीमचे कोच अमोल मुजुमदार; महिला वर्ल्डकप विजयानंतर कुंभारघर गावात आनंदाचा वर्षाव

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी अभियंत्यांवर गुन्हा दाखल!

World Cup जिंकताच, भारतीय खेळाडूंना लागली आणखी एक लॉटरी; जेमीमा, स्मृतीला प्रचंड नफा

Duplicate Voter Detection : राज्य निवडणूक आयोग संभाव्य दुबार मतदार कशाच्या आधारावर ठरवणार?

SCROLL FOR NEXT