File photo
File photo 
मराठवाडा

‘हे’ कर्मचारी वेतन आयोगापासून वंचितच : कोणते ते वाचलेच पाहिजे

प्रमोद चौधरी

नांदेड : सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांत दिवसेंदिवस भर पडत आहे. राज्यात ग्रंथालय चळवळीला दिशा देण्यासाठी शासनाने व्यंकाप्पा पत्की समिती स्थापन केली. मात्र, ग्रंथालय चळवळीच्या दशा संपलेल्या नाहीत. अद्यापय हे कर्मचारी वेतन आयोगापासून वंचितच आहेत.

‘ग्रंथालय आमदार’ हवा
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या वेतनश्रेणी आणि सेवाशर्ती यासाठी पत्की समितीचा अहवाल १८ आॅक्टोबर २००८ रोजी स्वीकारण्यात आला. परंतु, या अहवालाची आजपर्यंत अमलबजावणी करण्यास शासन टाळाटाळ करीत आहे. जिल्ह्यात सध्या ७५८ सार्वजनिक ग्रंथालये आहेत. राज्यातील १२ हजार ८६१ सार्वजनिक ग्रंथालयांसाठी स्वतंत्र ग्रंथालय खाते आणि ‘ग्रंथालय आमदार’ गरजेचा आहे. या खात्याचा कारभार सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याकडे आहे.

कृती कार्यक्रम शून्यच
काही वर्षांपूर्वी  ग्रांथालय परिषद अस्तित्वात आणली; परंतु कृती कार्यक्रम मात्र शून्य आहे. राज्य संघाची स्थापना झाल्यानंतर १९६७मध्ये विधिमंडळाने ‘ग्रंथालय कायदा’ केला. ग्रंथालय कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील चौथे राज्य आहे. ग्रंथालय कायद्यात काळानुरुप बदल करण्याची मागणी राज्य ग्रंथालय संघाने आणि कर्मचारी संघाने सातत्याने केली. शासनाने १९७० पासून सहा वेळा परीक्षण अनुदानामध्ये वाढ केली.

निवृत्तीचे वय ६५ करावे
ग्रंथालयाची पडताळणी करून पाच हजार ८०३ ग्रंथालयांना त्रुटीचे कारण दाखवून ५० टक्के अनुदान वाढ दिलेली नाही. अशा अनेक समस्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आहेत. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वाढत जाणाऱ्या महागाईचा विचार करून सध्याच्या अनुदानाच्या दुप्पट अनुदान करावे. सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे आणि वेतनश्रेणी व सेवाशर्ती लागू कराव्यात, अशा मागण्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या आहेत.

ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला
 

पद जिल्हा ‘अ’ तालुका ‘अ’ इतर ‘अ’ इतर ‘ब’ इतर ‘क’ इतर ‘ड’
ग्रंथपाल १०,५०० ७,५०० ५,००० ४,५०० ३,००० १,३८९
सहायक ग्रंथपाल ७,५०० ४,२०० ३,५०० ०० ०० ००
निर्गम सहायक ५,००० ०० ०० ०० ०० ००
लिपिक ४,५०० ३,८०० ३,००० ३०० ०० ००
शिपाई ३,००० २,२७८ १,८३४ १,५८९ १,४४५ ००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT