निदर्शने करताना कर्मचारी 
मराठवाडा

Video : परभणीत बॅंकेच्या संपाने कोटींचे व्यवहार ठप्प !

कैलास चव्हाण

परभणी : राष्ट्रीयीकृत बॅंक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार (ता. ३१) पासून तीन दिवस पुकारण्यात आलेल्या संपामुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बॅंक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालयासमोर निदर्शने करत संपात सहभाग घेतला. दरम्यान, बॅंका बंद होताच शहरातील एटीएमदेखील दुपारी रिकामे झाल्याने ग्राहकांची धावाधाव झाल्याचे पाहावयास मिळाले.

बँक कर्मचाऱ्यांच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक असोसिएशन या दोन मध्यवर्ती संघटनांनी हा बंद पुकारला आहे. वेतन वाढ आणि सुधारणा अशा मागण्यांसह दोनदिवसीय संप केला जात आहे. त्यामुळे शुक्रवारी बॅंकाचे व्यवहार ठप्प झाले होते. पगारपत्रकाच्या घटकावर २० टक्के वेतनवाढ देणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, स्पेशल एलिवेन्स हा बेसिकमध्ये समाविष्ठ करणे, एनपीएस योजना निकाली काढणे, पेन्शनमध्ये सुधारणा करणे, कुटुंब पेन्शनमध्ये सुधारणा करणे, कर्मचारी कल्याण निधी हा बॅंकेच्या ऑपरेटिंग नफ्यानुसार निर्धारित करावा, निवृत्ती लाभावर मर्यादेशिवाय प्राप्ती करातून सूट मिळावी, व्यवसायाचे तास, दुपारच्या जेवण वेळेची निश्चिती करावी, लिव्ह बॅंकेची व्यवस्था करा, अधिकाऱ्यांसाठी निर्धारित कामाचे तास, कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन आदी मागण्यांसाठी हा संप केला जात आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निदर्शने
 मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील टप्प्यात ११ ते १३ मार्च दरम्यान, तीन दिवसांचा संप केला जाणार असून त्यानंतर एक एप्रिलपासून बेमुदत संप केला जाणार असल्याची माहिती बॅंक अधिकारी संघटनेकडून देण्यात आली. या मागण्यांसाठी परभणी स्टेट बॅंक इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना निवेदन दिले. या संपात जिल्ह्यातील २५० अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

तीन दिवस बॅंका बंद
शुक्रवारपासून बॅंकांनी संप पुकारल्याने शुक्रवार व शनिवारी बॅंक संपामुळे, तर रविवारी सुटी असल्याने तीन दिवस बॅंकांचे व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे जवळपास कोटींचा व्यवहार ठप्प झाला. दरम्यान, बॅंका बंद होताच शहरातील एटीएमदेखील शुक्रवारी दुपारी रिकामे झाल्याने ग्राहकांची धावाधाव झाल्याचे पाहावयास मिळाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, पुढे अजून इंधन स्वस्त होणार?

NASA ISRO Visit : नासा, इस्रो भेटीसाठी विद्यार्थ्यांचा कल; १९ हजार २५४ मुलांनी दिली परीक्षा

Phondaghat Landslide : कोकणात चाललाय? सावधान! मुसळधार पावसामुळे फोंडाघाटात दरड कोसळली, देवगड-निपाणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

Balbharati Book Errors : बालभारतीकडून चुकले चौथीचे ‘गणित’! रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकली; ‘लांबी-वजना’तही घोळ

SCROLL FOR NEXT