Nanded News 
मराठवाडा

डुकरं घोसाळून चावतायत, कुणी पकडायची हिंमत करेना

शिवचरण वावळे

नांदेड : आजारी व्यक्तीस विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आलेल्या नातलगावर परिसरातीलच मोकाट डुकरे थेट हल्ला करुन जखमी करत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालय परीसरातील रुग्णांच्या नातलगांमध्ये दहशत पसरली आहे.

अनेक नातलग आपल्या रुग्णास भेटुन परिसरात जेवण करण्यासाठी बसतात. तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जेवणासाठी निवारा नसल्यामुळे उघड्यावर बसावे लागते. वसमतचे संतोष गायकवाड आणि मुखेडच्या कांताबाई पवार या देखील इतरांप्रमाणे शनिवारी (ता.२९ फेब्रुवारी २०२०) संध्याकाळच्या वेळी रुग्णास भेटुन रुग्णालयाच्या परीसरात जेवण करत होते. जेवण करत असताना अच्यानक पाठिमागुन आलेल्या एका डुकराने त्यांच्यावर हल्ला करून हाताला चावा घेतला.

डुकराने हल्ला केलेल्या दोन्ही व्यक्तीचे हात रक्तबंबाळ झाले होते. त्यामुळे दोन्ही व्यक्तीस एकाच वेळी रुग्णालयात दुसऱ्या वॉर्डात भरती करावे लागले. शासकीय रुग्णालय म्हणजे आरोग्याची हमी असते. परंतू इथे आलेल्या नातेवाईकांमध्ये डुकरांची दहशत पसरली आहे. अनेकांना डुक्कर चावल्याने दुहेरी संकट ओढवत आहे. एका वॉर्डात घरातील रुग्ण  तर दुसऱ्या वॉर्डात नातेवाईकांना भरती व्हावे लागत आहे. 

उघडयावरच फेकले जाते शिल्लक अन्न

रुग्णालय परीसरात अनेक ठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साचलेले असतात. या कचऱ्यामध्ये रक्तामासाने माखलेले कपडे, पाण्याच्या बॉटल याशिवाय शिल्लक अन्न सुद्धा उघड्यावर फेकुन दिले जात अल्यामुळे डुकरांना सहज खाद्य मिळते.

त्यामुळे उघड्यावर फेकुन दिलेल्या या अन्नावर ताव मारण्यासाठी डुकरे कळपाने येतात. उघड्यावरचे अन्न फस्त झाल्याने डुकरांचा हा कळप रुग्णालय परिसरात बसलेल्या नागरीकांच्या मागावर येतात. आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करुन त्यांच्या हातातील जेवणाच्या वस्तू, फळे खाण्याचा प्रयत्न करात. यात अनेकांना गंभीर दुखापत देखील होत आहे. 

डुकरांना आवर घालणार कोण

अनेक वर्षांपासून शासकीय रुग्णालयात उघड्यावर कचरा टाकला जात होता. परंतू ‘सकाळ’ने सतत हा विषय लावून धरल्याने प्रशासनाने महिनाभरापूर्वीच दखल घेत महापालीके मार्फत रुग्णालयातील जैविक कचरा उचलण्यास सुरुवात केली.

परंतू डुकरांचा अजून बंदोबस्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन किंवा कुठलीही स्वंयसेवी संस्था पुढे आलेली नाही. येत नाही. त्यामुळे अजून किती जणांना डुकरांच्या हल्ल्याचा सामना करावा लागेल, असा संतप्त प्रश्‍न नातेवाईकांमधून उपस्थित केला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT