file photo 
मराठवाडा

टिईटीच्या परीक्षेत परीक्षा परिषदच नापास !

नवनाथ येवले

नांदेड : शिक्षकांच्या नोकरीसाठी राज्य शासनाने सुरू केलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता.१९) शहरात सकाळच्या सत्रात २९ तर दुपारच्या सत्रात २३ केंद्रावर घेण्यात आली. दरम्यान, १६ हजार ७७२ उमेदवारां पैकी एक हजार २८१ उमेदवार गैरहजर राहीले. राज्य परीक्षा मंडळाकडून प्राप्त प्रश्नपत्रिकांमध्ये व्याकरणाच्या चुकांमुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला. राज्य परीक्षा परिषदेच्या ‘ए’ व ‘डि’ या प्रश्नपत्रिका संचातील एकूण १४ प्रश्नांमध्ये व्याकरण चुकासह पर्याय गायब झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षेत राज्य परीक्षा परिषदच नापास झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

शिक्षकांच्या नोकरीसाठी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यभरात रविवारी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) परीक्षा घेण्यात आली. शहरातील २९ केंद्रावर सकाळ च्या सत्रात तर दुपारच्या सत्रात २३ केंद्रवार जिल्हाभरातील १६ हजार ७७२ उमेदवारां पैकी एक हजार २८१ उमेदवार गैरहजर राहीले. त्यानुसार १५ हजार ४९१ भावी गुरुजींनी पेरच्या माध्यमातून पात्रता आजमावली. परीक्षा परिषदेकडून चार संचामध्ये देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेमधील व्याकरणांच्या चुकांमुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला.

चुकांमुळे उडाला गोंधळ

शिक्षण विभागाकडून होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकांमध्ये अनेक प्रश्नांमध्ये ‘प्रिंटिंग मिस्टेक’ व व्याकरणातील चुकांमुळे उत्तर लिहिताना उमेदवारात गोंधळ उडाला. शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांमध्येच चुका होत असल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेनंतर नाराजी व्यक्त केली.

या प्रश्नसंचात झाल्या चुका

सकाळच्या सत्रातील ‘ए’ या संचामधील प्रश्न क्रमांक सहाव्यामधील पर्याय चुकले, प्रश्न क्रमांक १४ मधील वाक्य गायब, प्रश्न क्रमांक ५४ मध्ये अधोरेखित शब्द दिली नाही, प्रश्न ५६ मध्ये व्याकरण चुक, प्रश्न ६३ मध्ये पर्याय व विकल्पामध्ये चुक तर प्रश्न ७२, ७८, ८८ मध्ये व्याकरण चुका आढळून आल्या. दुपारच्या सत्रातील ‘डी’ संच मधील प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक ९१ मध्ये हा ऐवजी हो, प्रश्न क्रमांक १०३ मध्ये जुळवा ऐवजी जळवा, प्रश्न ११८ मध्ये प्रमाणवेळ ऐवजी प्रमाणवेक, प्रश्न १२१ अण्विक ऐवजी नावीक, प्रश्न क्रमांक १३४ मध्ये देशात ऐवजी जशात तर प्रश्न क्रमांक १३१ मधील पर्याय गायब झाल्याच्या तोंडी तक्रारी दिल्या.

उमेदवारांना तक्रारीची संधी

टीईटी परीक्षेच्या प्रश्नसंचामधे काही त्रुटी किंवा उनिव असल्यास उमेदवार राज्य परीक्षा परिषद पुणे विभागाकडे पुरव्यासह लेखी स्वरुपात अर्ज करु शकतात.

बी. आय. येरपुलवार (जिल्हा परिवेक्षक)

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT