Excessive rainfall in nineteen circles in Hingoli district 
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात एकोणवीस मंडळात अतिवृष्टी ; कयाधु, आसना नदीला पुर

चोवीस तासात ८४.९० मिलीमीटर पाऊस; सलग सहाव्या दिवशी सुर्यदर्शन नाही

राजेश दारव्हेकर

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात मागील चोवीस तासात बुधवार ता. १३ सकाळी आठ वाजेपर्यंत ८४.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १९ मंडळात मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तर कयाधु,. आसना, पैनगंगा या नद्यांना पुर आला आहे. या पावसाने पिकांचे नुकसान देखील झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक बाळापूर व वारंगा मंडळात २१० मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागच्या पाच दिवसापासून सलग पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ८४.९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली तालुका ६१.४० मिलीमीटर, कळमनुरी १३२.६० वसमत ९९.५० औंढा ७४.५० तर सेनगाव तालुक्यात ५४.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

म़ंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे : हिंगोली मंडळात ५६.८ नर्सी नामदेव ५३.३, सिरसम १०७.३, बासंबा ५४.१, डिग्रस ५७.८, माळहिवरा ४७.३, खांबाळा ५३.३ तर हिंगोली तालुका एकुण ६१.४ मिलीमीटर पाऊस झाला. कळमनुरी मंडळात ७८.८, मिलीमीटर वाकोडी ९२.२, नांदापुर ७९.३, बाळापुर २१०.५, डोंगरकडा १२४, वारंगा २१०.५ एकुण १३२.६ मिलीमीटर पाऊस झाला.

वसमत मंडळात वसमत ११०.८, आंबा ९७.८, हयातनगर १२५ गिरगाव ९६.८, हट्टा ७९.८ टेभुर्णी ९२.५, कुरुंदा ९३.८, मिलीमीटर पाऊस झाला तालुक्यात ९९.५ मिलीमीटर पाऊस झाला. औंढा म़डळात ७३.३,येहळेगाव ७२, साळणा ७३.३, जवळा ७९.५ एकुण ७४.५ मिलीमीटर पाऊस झाला. सेनगाव मंडळात ५६.५, गोरेगाव १९.८, आजेगाव ५५.३, साखरा ४७.३, पानकनेरगाव ४०.४, हत्ता ७५.८ तर एकुण ५४.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, बुधवार साडेअकरा पासून पावसाचा जोर वाढला आहे. कळमनुरी तालुक्यातील धांडे पिंपरी जवळुन वाहणाऱ्या ओढ्याला आलेल्या पाण्याने धांडे पिंपरी ते बाळापूर रस्ता बंद झाला आहे. बाळापूर येथून वाहणाऱ्या एका नाल्याचे पाणी बाळापूर वाडी येथील काही जणांच्या घरात शिरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Law: पगार, भत्ते आणि ग्रॅच्युइटी आता नवीन कामगार संहितेत कशी मोजली जाणार? कामगार मंत्रालयाकडून मसुदा नियम जाहीर

Viral Video: अरे व्वा! शिक्षकाने स्वतःच्या पैशांनी मुलांना दिला विमान प्रवासाचा अनुभव, व्हिडिओ पाहून नेटकरी भावुक

Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

School Rules: शिक्षकांना करता येणार नाही विद्यार्थ्यांच्या रील, शिक्षण विभागाची नवी नियमावली

Latest Marathi News Live Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अंधेरीत मनसेला मोठे खिंडार

SCROLL FOR NEXT