Excise Duty Department Raid, Latur News  
मराठवाडा

उत्पादन शुल्क विभागाचे वरातीमागून घोडे, बेकायदा दारू विक्रीविरूद्ध तोंडदेखली कारवाई

विकास गाढवे

लातूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीपूर्वीच जिल्ह्यात प्रशासनाने परवानाधारक दुकानांतून दारूविक्री बंद केली होती. यामुळे जिल्ह्यात अनेक भागात बेकायदा दारू विक्रीला ऊत आला. हातभट्टी दारूचे उत्पादन शंभरपटीने वाढले. हातभट्टी दारूचा धुमाकूळ स्थानिक पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. लढाईच्या काळातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शस्त्र म्यान करत होम क्वारंटाईनमध्ये रहाणे पसंत केले. जिल्हाभरातून विभागाच्या नावाने ओरड सुरू होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंडदेखली कारवाई करत दोन दिवसांत २२ ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केल्याचा आव आणला आहे.


कोरोनाचा संसर्ग वाढू न देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदीच्या आधीच जिल्ह्यातील सर्व परवानाधारक देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद केली होती. याचा फायदा या दुकानदारांनीही उचलला. चढ्या दराने दारूची विक्री करत टाळेबंदीच्या काळात हात धुवून घेतला. अजूनही अनेक दुकानांतून मागच्या दाराने दारू विक्री सुरूच आहे. देशी व विदेशी दारूचे भाव गगनाला भिडल्याने तळीरामांनी हातभट्टीचा आधार घेतला. दुधाची तहान ताकावर भागवणे सुरू झाल्याने हातभट्टी दारूला कधी नव्हे ते सुगीचे दिवस आले. अनेक भागात या दारूचे उत्पादन शंभर पटीने वाढले. पोलिसांकडे बेकायदा दारू विक्रीच्या मोठ्या संख्येने तक्रारी येऊ लागल्या. संचारबंदीची जबाबदारी पार पाडतानाच पोलिसांनी बेकायदा दारूविरूद्ध कारवाई सुरू ठेवली. पोलिसांच्या कारवाईने काहीच फरक पडत नव्हता. यामुळेच दारूबंदीची खरी जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपला का, अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या. दारू दुकाने बंद केल्यापासून विभागाचे अधिकारी व कर्मचारी होम क्वारंटाईनमध्येच होते. या विभागाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त होऊ लागताच विभागाने कारवाई सुरू असल्याचे दाखवत २२ ठिकाणी छापे टाकल्याचा दावा कारवाईसाठी पुढाकार घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची खंडीभर नावे असलेल्या प्रसिद्धपत्रकातून केला आहे.

वाचा ः दुचाकीसाठी पेट्रोल येतंय कोठून ? 

कारवाईची नेहमीच ठिकाणे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्याचा दावा करताना विभागाने नेहमीच ठिकाणे पुढे केली आहेत. यात वसंतनगरतांडा, कोळगांव तांडा, कानडी बोरगाव तांडा, कवळखेड तांडा, बोरतळ तांडा व डोंगरशेळकी तांड्यांचा समावेश आहे. कोराळवाडी (ता. निलंगा) येथे विशेष कारवाई करून एक लाख वीस हजाराचा गावठी दारूचा मुद्देमाल जप्त केला आहे. तेरा जणांना अटक करण्यात आल्याचेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सहा व आठ एप्रिल रोजी हे छापे घालण्यात आले असून सर्वत्र बेकायदा दारूला ऊत आला असला तरी विभागाचे अधिकारी दोन दिवसाच्याच कारवाईवर समाधानी दिसत आहेत.

जप्त वाहनांचीच किंमत जास्त
उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत जप्त केलेल्या दारूपेक्षा नष्ट केलेल्या दारूची आणि जप्त केलेल्या वाहनांचीच किंमत जास्त आढळून येते. दोन दिवसाच्या कारवाईतही विभागाने २४० लिटर हातभट्टी, साडेपाच हजार लिटर रसायन, २९९ लिटर देशी दारू, ७३ लिटर विदेशी दारू, १५ लिटर बिअर व एक चारचाकी वाहन जप्त केले आहे. हा सर्व मिळून चार लाख 51५१ हजार ९०६ रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. तोंडदेखल्या कारवाईला व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी विभागाने एका कर्मचाऱ्याची खास नियुक्ती केली असून हा कर्मचारी आपल्या वेगळ्या स्टाईलने कारवाईची माहिती माध्यमाना पुरवताना दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

Latest Marathi News Updates : भाजप आमदार बसवराजविरुद्ध गुंडाच्‍या खूनप्रकरणी एफआयआर दाखल

SCROLL FOR NEXT