download 
मराठवाडा

परभणी शहर हद्दीत संचारबंदीला मुदतवाढ, वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय... 

गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात व विशेषत: परभणी शहरात कोरोना विषाणु संसर्गाच्या रुग्णात कमालीची वाढ झाल्याने जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सध्या लागू असलेल्या संचारबंदीस मुदतवाढ दिली आहे. आता १४ ऑगस्टपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परभणी महापालिका हद्द आणि पाच किलोमिटरच्या परिसरात कलम १४४ नुसार रविवार (ता.नऊ) रात्री १२ वाजेपासून ते ता.१४ ऑगस्टचे रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहेत. 

यांना संचारबंदीत सुट
या संचारबंदीतुन सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी आणि त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, शासकीय निवारागृहात तसेच शहरात अन्न वाटप करणारे एनजीओ व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपत्काल व अत्यावश्यक सेवा, गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक तसेच पेट्रोलपंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने आणि दुध विक्रेत्यांनी केवळ घरोघरी जावून सकाळी सहा ते नऊ या वेळेत दूध विक्री करावी. 

ही वाहने, सेवा फक्त अत्यावश्‍यक कामांसाठी 
राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल बँका, खाजगी बँका, नागरी सहकारी बँका केवळ रास्त भाव दुकानदार, पेट्रोल पंप चालक, गॅस वितरक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, कृषी सेवा केंद्र व कृषी साहित्य विक्री सेवा केंद्र, यांच्याकडून चलनाद्वारे पैसे भरणा करणे व बँकेची ग्रामीण भागात रोकड घेऊन जाणारी वाहने, खत कृषी बी-बियाणे विक्री व वाहतूक त्यांची गोदामे आणि दुकाने यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार, महा ई सेवा केंद्र व सीएससी सेंटर यांना फक्त पिक विमा संबंधित कामाकरिता रात्री आठ वाजेपर्यंत सूट, आदी व्यक्ती व समुहाला सुट राहील असे ही या आदेशात म्हटले आहे. 

बाहेर फिरल्यास कारवाई 
वैद्यकीय आपत्काल व अत्यावश्यक सेवेशिवाय नागरी भागात इतर कोणतीही व्यक्ती अथवा वाहने रस्त्याने, बाजारात, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येणार आहे. असेही जिल्हाधिकारी परभणी यांनी आदेशात नमूद केले आहे. 

संपादन ः राजन मंगरुळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT