seed subsidy seed subsidy
मराठवाडा

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बियाणे अनुदानाच्या अर्जासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ

लाभ घेण्याचे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

लातूर: महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा लाभ 'एकाच अर्जाद्वारे' देण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळणे पर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. आता अर्ज करण्याची मुदत २० मे पर्यंत वाढवण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबी करिता अर्ज करावयाचा आहे. यातील बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरील शेतकरी योजनेत बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेत लाभार्थीना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून सोयाबीन, भात तूर मूग उडीद मका, बाजरी आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे. यासाठी पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे होती. मात्र, क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार ही मुदत आता २० पर्यंत वाढवण्यात आल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले.

असा आहे संकेतस्थळ
महाडीबीटी पोर्टलचे https;//mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅब, सामुदायिक सेवा केंद्र व ग्रामपंचायतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी योजनासाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावे लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ईमेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. गावसाने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! पीक विम्यासाठी काय करावं? किती पैसे मिळणार? पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT