file photo 
मराठवाडा

ऑनलाइन शिक्षणात अडचणींचा सामना

गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणू संसर्गानंतर जग बदलले आहे. अगदी छोट्या क्षेत्रापासून ते मोठमोठ्या उद्योगांतील अचानक झालेल्या बदलांमुळे सर्वच जण अडचणीत सापडले आहेत. हा बदल आत्मसात करण्यासाठी सर्वांनाचा ठराविक कलावधी लागणार आहे. जसा उद्योगधंद्यात बदल झाला, तशाच बदलाला शिक्षणक्षेत्रालाही सामोरे जावे लागत आहे. आता शैक्षणिक क्षेत्रातील नवे स्थित्यंतर येऊ घातला आहे, तो म्हणजे ऑनलाइन शिक्षणाचा. परंतु, या ऑनलाइन शिक्षणात अनंत अडचणींचा सामना विद्यार्थ्यांसह शिक्षण व शाळाचालकांना करावा लागत आहे.

कोरोना विषाणू संसर्गानंतर जगात बदलाचे वारे वाहत आहेत. जगावर आलेल्या या संकटामुळे अवघ्या दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीतच सर्वच जग बदलून गेले. सर्वक्षेत्रात बदल होताना दिसत आहेत. परंतु, सर्वात महत्त्वाचा बदल आहे तो शैक्षणिक क्षेत्रातील. कारण यापुढे किमान काही काळ तरी शाळा भरतील की नाही याची शाश्वती नाही. मागच्या तीन महिन्यांपासून घरी बसल्यामुळे व भविष्यात बाहेर पडणे तितकेसे सुरक्षित नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची मागणी सुद्धा वाढली आहे. त्यात संगणक, लॅपटॉप, मोबाइल आणि हे सर्व चालविण्यासाठी दर्जेदार इंटरनेट यांचा समावेश आहे. परंतु, आपल्याकडे उत्तम दर्जाचे इंटरनेट उपलब्ध नाही. सतत दोन ते चार तास स्क्रीनसमोर बसल्यानंतर होणारा दुष्परिणामदेखील पाहावा लागणार आहे. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


हेही वाचा : ‘तो’ तांदूळ सरकारी वितरणाचाच- गुन्हा दाखल -
ऑनलाइन शिक्षण म्हणजे काय?
व्हिडिओ कॉन्फरन्ससारखे लाईव्ह लेक्चरद्वारे ऐकणे म्हणजेच ऑनलाइन शिक्षण असा गैरसमज करून घेण्याचे प्रथम आपण थांबविले पाहिजे. गेल्या महिन्याभरात शहरी भागातील काही शाळांमधून महाविद्यालयांमधून Zoom व तत्सम माध्यमातून ऑनलाइन तासिका भरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हेच ऑनलाइन शिक्षण हा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. ऑनलाइन शिक्षण याचा सोपा अर्थ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला  घरबसल्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळणे. शैक्षणिक संस्थेत न जाता प्रवेशापासून डिग्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेट या माध्यमातून मिळवू शकतो.


हेही वाचा : हिंगोली ब्रेकींग: कतार राष्ट्रातून परतलेल्या तरुणासह चौघे पॉझिटिव्ह, संख्या पोहचली ३३ वर
तज्ज्ञ काय म्हणतात.....?

अडचण एक नाही तर अनंत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास नीट कळत नाही व तसेच मूल्यमापन करणे कठीण जाते.  मुलांच्या चेहऱ्यावरून दिसणारे हावभाव यावरून मुलांना समजले की नाही हे कळते, पण ऑनलाइन टीचिंगमध्ये ते दिसत नाही. प्रत्येकाकडे मोबाइल असणे अवघडच व त्यातल्या त्यात बहीण, भाऊ असतील तर क्लासच्या यावेळी मोबाइल नेमका कोण वापरणार? होमवर्क तपासता येत नाही. आई किंवा वडील जर कामावर जात असतील तर घरी मुलांना मोबाइल मिळत नाही. नेहमी मोबाइलच्या संपर्कात राहिल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो व हेडफोन्स वापरल्यामुळे कान दुखतात. कानांची ऐकण्याची क्षमता कमी होते. त्याप्रमाणे वेगवेगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स येतात व त्यामुळे क्लास नीट अटेंड करता नाही आणि सर्वात महत्त्वाची बाब पालकांकडे त्यांच्या मोबाइलमध्ये असणारा इंटरनेट डेटा पुरेसा असेल तरच क्लास अटेंड करता येतो, अन्यथा क्लास व्यवस्थित अटेंड होत नाही.

- अर्चना जोशी. प्राचार्य, बी. एस. इंग्लिश स्कूल, परभणी

पालक काय म्हणतात....?

अचडणी येताहेत परंतु मार्ग काढतोय ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे या परिस्थितीत खूपच महत्त्वाचा आहे. कारण कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा भरणे सध्या तरी शक्य वाटत नाही. परंतु, माझ्या मुलांच्या शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. माझी मुलगी १२ वी वर्गात, तर मुलगा आठवीच्या वर्गात आहे. मुलीचे दररोज चार ते साडेचार तास ऑनलाइन क्लास चालतात. तर मुलांचेही त्याच वेळी क्लास येतात. अशा वेळी एकाच मोबाइलवर दोघांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. शाळा किंवा महाविद्यालय त्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत. परंतु, ज्या क्षमतेने इंटरनेट हवे आहे तसे मिळत नाही. शिवाय वीजपुरवठ्याचीदेखील अडचण आहे. यातून मार्ग काढावा लागत आहे.

- गजानन निळकंठे, पालक, परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT