गोंदी (जि.जालना) - ग्रामीण भागात ‘कोरोना’ विषाणूमुळे धास्तावलेल्या ग्रामस्थांना गंडविण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथे तीन तोतया परिचारिकांनी चक्क अनेक ग्रामस्थांच्या बालकांना साठ रुपये घेऊन ‘कोरोना’चा म्हणून खोटाच डोस पाजला. ग्रामस्थांना लुटणाऱ्या या तीन तोतया परिचारकांवर गोंदी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साष्टपिंपळगाव (ता. अंबड) येथे सोमवारी (ता.नऊ) सकाळी दहाच्या दरम्यान तीन तोतया परिचारिका गावात आल्या होत्या. कोरोना विषाणूपासून लहान मुलांची सुटका करून घेण्यासाठी लस उपलब्ध झाली असून, ती केवळ साठ रुपयांत विकत मिळत असल्याचे सांगितले. गावातील लहान मुलांना बाटलीतील दोन ते तीन थेंब पाजत होत्या. काही पालकांना त्यांच्याविषयी संशय आला.
हेही वाचा : शाळांमध्ये करणार ‘कोरोना’बाबत जागृती
त्यांनी शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महादेव माणिक मुंढे यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ सूत्रे हालवीत त्या परिचारिकांची सत्यता पडताळली. त्यात या परिचारिकांनी आरोग्यखात्याची परवानगी न घेता संगनमताने ही लुबाडणूक चालवल्याचे उघडकीस आले; तसेच त्यांच्याकडील ओळखपत्रही बनावट असल्याचे आढळले.
हेही वाचा : भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस
श्री. मुंढे यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात संशयित राधा रामनाथ सामसे (रा. साक्षाळपिंपरी ता. गेवराई जि. बीड), सीमा कृष्णा आंधळे (रा. रुई पिंपळा ता. वडवणी जि. बीड), संगीता राजेंद्र आव्हाड (रा. डोईफोडवाडी ता. जि. बीड) या तिघींवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.