crime crime
मराठवाडा

उस्मानाबादेत मृत व्यक्तीला ई पास, गुन्हा दाखल

कळंब तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने सध्या कडक संचारबंदी लागू केली आहे

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): आंतरजिल्हा प्रवासाठी बनावट ई-पास देणाऱ्या शहरातील अमित जाधवर यांच्याविरुद्ध कळंब पोलिसात बुधवार (ता.१९)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ई-पास देणारी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना असून याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करीत आहे. दरम्यान गुरुवार (ता.२०) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयांनी २४ मेपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जाधवर याने १० ई-पास बनावट दिल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.

कळंब तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने शासनाने सध्या कडक संचारबंदी लागू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एप्रिल महिन्यापासून आंतरजिल्हा प्रवासासाठी शासनाने ऑनलाइन ई-पास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ई-पास सेवेचा काही लोकांनी गैरफायदा घेत असल्याचा प्रकार समोर आला असून यामध्ये प्रशासकी यंत्रणेचे लोक सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आल्याने सरकारने लॉकडाऊन केले. त्यामुळे सर्व जनजीवन ठप्प झाले. आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास शासनाने आवश्यक केला.

तांत्रिक अडचणींमुळे ई-पास तत्काळ मिळत नसल्याने लोकांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी अनेक कागदपत्राची आवश्यकता होती. खूप जणांना तर बाहेरगावी बीपी, शुगर किंवा इतर वैद्यकीय कारणासाठी जाण्याची आवश्यकता आहे. याचा गैरफायदा काही महाभागांनी घेतला आणि इथूनच ई-पासचा  काळाबाजार सुरु झाला. शहरातील अमित जाधवर यांनी बनावट ई-पास दिल्या प्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गेली अनेक दिवसांपासून कळंब शहरात ई-पासचा काळाबाजार सुरू आहे.

त्यानुसार ई-पासचा घोटाळा बाहेर काढण्याची शहरातील विकास कदम, इम्रान मुल्ला, शकील काजी, आलिम अत्तार यांनी ठरवलं. ई-पास देणारा अमित जाधवर नावाच्या व्यक्तीला विकास कदम यांनी १५ मे रोजी फोन केला व हैदराबादचा पास बनवून दे असे सांगितले. त्यावेळेस त्यांनी होकार दिला आणि आधार कार्ड पाठवायला सांगितले. मात्र या वेळी इ-पास देताना त्यांनी एक अट ठेवली की ई-पाससोबत तुला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा द्यावे लागेल. त्यानुसार विकास कदम यांनी दिनांक १७ मे रोजी स्वतःचे आधार कार्ड त्याचप्रमाणे इतर दोन मयत व्यक्तीचे आधार कार्ड अमित जाधवर यास व्हाट्सअप केले. त्याचप्रमाणे कळंब ते हैदराबाद जायचे सांगितले. त्यांच्या मागणीनुसार आठशे रुपये फोनपे केले. त्यानंतर त्यांना पास मिळाला. त्यातील दोन व्यक्ती मयत आहेत. ज्यावेळेस त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र पाहिलं त्यावेळेस असं लक्षात आलं की ते वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आहेत.

उपजिल्हा रुग्णालय कळंब येथील ते वैद्यकीय प्रमाणपत्र आहेत. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर बोगस ईपास बनवणारे रॅकेट असल्याचे दिसून आले. त्यानुसार कळंब पोलीसात अमित जाधवर व यामध्ये सामील असणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार दिली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम याानी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT