fake police 
मराठवाडा

पोलिस असल्याचे सांगत शेतकऱ्याची भरदिवसा फसवणूक

बाबासाहेब गोंटे

अंबड (जि. जालना) : अंबड तालुक्यातील नागोण्याची वाडी येथील दूध उत्पादक व विक्री करणाऱ्या शेतकर्यांची भरदिवसा पोलिस असल्याची बतावणी करत फसवणूक केली आहे. हे प्रकरण अंबड तालुक्यात घडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड तालुक्यातील नागोण्याचीवाडी येथील दूध उत्पादक व विक्री करणारे शेतकरी दगडू सखाराम वंजारे हे शनिवारी (ता.12) दुपारी बारा ते साडे बारा वाजेच्या दरम्यान पाचोड येथे दूध विक्री करून आपल्या नागोण्याचीवाडी गावाकडे लुनावरून चालले होते. पाचोडकडून पाठीमागून दुचाकीवरून येऊन दगडू वंजारे यांना रस्त्यात रोखले आपण पोलिस असल्याची बतावणी केली.

दुधाच्या रिकाम्या कॅन मध्ये डोकावून पाहत आपण यातून गांजा विक्री करता असे म्हणत अगोदर वंजारे यांना भयभीत केले. नंतर आपण बोटात सोन्याच्या अंगठ्या का ठेवता वातावरण फार खराब आहे. असे म्हणत सोन्याच्या तीस हजार रुपये किंमतीच्या दोन अंगठ्या हातरुमाल बांधून पाठीमागून आलेल्या दुसऱ्या इसमा बरोबर दुचाकीवरून पलायन केले.

अंबड पोलिस ठाण्यात दगडू वंजारे यांनी अज्ञात चोरट्याने पोलिस असल्याची बतावणी करून सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्याची तक्रार दिली आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे हे करत आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार हर्षवर्धन मोरे यांनी दिली आहे.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT