A farmer has died in a lightning strike at Waghjali.jpg 
मराठवाडा

वाघजाळी येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

विठ्ठल देशमुख

सेनगाव (हिंगोली) : तालुक्यातील वाघजळी शिवारात वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना (ता.१०) शनिवारी सायंकाळी घडली आहे.

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे शेतात हळद झाकण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. लक्ष्मण नारायण तांबिले (वय ४५) असे शेतकऱ्याचे नाव असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

तालुक्यातील वाघजाळी येथे सायंकाळी पाच वाजता वादळी वारे व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतात काढून ठेवलेले हळदीच्या पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी शेतकरी लक्ष्मण तांबिले हे शेतात हळदीचे पिक झाकण्यासाठी गेले. या पिकावर ताडपत्री टाकत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळून ते जखमी अवस्थेत जागीच कोसळले. शेतात वीज  पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावले. त्या ठिकाणी तांबिले गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला.

दरम्यान त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रिसोड येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला असून उत्तरीय तपासणीच्या अहवालानंतर शासनाच्या नियमानुसार मदत दिली जाणार असल्याचे तहसील प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान सध्या सेनगाव तालुक्यात हळद काढणीच्या कामाला वेग आल्याने हळद काढणी सुरू आहे. शेतात हळदीची ढिगारे लागले आहेत. त्यात अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी ते ढिगारे झाकून ठेवत आहेत. श्री. तांबिले देखील हळदीचा ढिगारा झाकत असताना ही घटना घडली आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारत-बांगलादेश सेमीफायनलमध्ये आमनेसामने! गोल्ड मेडलच्या लढतीत मिळवणार साथ? कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather: मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, २५ ते २८ सप्टेंबर राज्यात पावसाची शक्यता

Shahi Tukda Recipe: सणासुदीला बनवा लज्जतदार स्वीट डिश; कुरकुरीत ब्रेड अन् केशर-रबडीयुक्त शाही तुकडा!

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

SCROLL FOR NEXT