संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

बीडमध्ये बिबट्या-लांडग्यांची धास्ती, दोन बोकडांचा पाडला फडशा, शेळी बेपत्ता...

सकाळ वृत्तसेवा

किल्लेधारूर (जि. बीड) - तालुक्‍यातील काटेवाडीत बिबट्याने दोन बोकडांचा फडशा पाडल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. ही घटना बुधवारी (ता. 22) उघडकीस आली. 

तालुक्‍यात वारंवार बिबट्यांचा वावर वाढल्याच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. यात पाळीव प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. काटेवाडी येथील शेतकरी गोरख विठ्ठल गोरे यांच्या शेतातील घर व कोठा जवळजवळ आहे. कोठ्यावर दोन बोकड आणि शेळी बांधलेली होती.

मंगळवारी मध्यरात्री अचानक बिबट्याने चाल करून दोन बोकडांचा फडशा पाडला. शेळीही बेपत्ता आहे. यासंदर्भात वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी एम. एस. मुंडे व वनपाल ए. एम. लांडगे यांनी पाहणी करून पंचनामा केला. परिक्षेत्र अधिकारी मुंडे म्हणाले, की मारलेल्या बोकडांच्या अवस्थेवर हल्ला करणारा प्राणी बिबट्या आहे.

दुसऱ्या बोकडाच्या पोटाला चावा घेणारा प्राणी लांडगा असू शकतो. ठशात अस्पष्टता असल्याने बिबट्या असल्याबाबत संशय आहे. रात्री शेतकऱ्यांनी सावध राहावे, सुरक्षेसाठी जवळ लाठी व बॅटरी ठेवावी. ग्रामस्थ रामप्रभू मुंडे म्हणाले, की कासारी बोडखा येथे जाणाऱ्या शिक्षक व सहकाऱ्यांना तीन दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. साठवण तलावात पुरेसा पाणीसाठा झाल्याने उसाच्या फडातील रानडुकरांच्या शोधात बिबट्या असावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT