पिंपळगांव रेणूकाई : शेतात जाण्यासाठी वाहनात संसारोपयोगी साहित्य भरताना ग्रामस्थ.  
मराठवाडा

गड्या आपला शेत बरा... 

प्रकाश ढमाले

पिंपळगांव रेणूकाई (जि.जालना) : कोरोना विषाणू रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणून प्रशासन विविध उपाययोजना करत असतानाच ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी चिमुकल्यासह नकोच गावात, आपला शेतच बरा असा विचार करत शेतात राहण्याचा मार्ग निवडला आहे. 
सध्या जगभरात कोरानाचेच पेव सुरू आहे. पिंपळगांव रेणूकाई (ता.भोकरदन) गावातील सर्व दुकाने, व्यवसाय, कार्यालये बंद असल्याने गावात शुकशुकाट निर्माण झाला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. गावात अद्याप कोरोनाचा एकही संशयित आढळला नाही.

प्रशासन विविध प्रयत्न करत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच बरोबर ग्रामस्थही कोरोनाला प्रतिबंध केवळ स्वतःची काळजी घेणे हेच औषध म्हणून आपली सावधगिरी बाळगत आहे. राज्यात संचारबंदी झाल्याने व बालकांची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला संसार काही दिवस शेतात मांडावा असा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने बरेच कुटुंब शेताकडे संसार उपयुक्त साहित्य घेऊन जाताना दिसत आहे. 
शिवाय गावात बाहेर गावी राहणारे ग्रामस्थही आले असून त्यांच्या नावाची यादी वाचन करून त्यांच्याशी संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. 

ग्रामस्थांनी भयभीत होऊ नये, अफवांवर विश्‍वास ठेवू नये. सर्व यंत्रणा त्यांच्या पाठीशी अद्याप संशयित असे कोणी सापडले नसून ग्रामस्थांनी दक्ष राहणे आवश्‍यक आहे. बाहेर गावावरून आलेल्यांची तपासणी करून घेतल्या जात आहे. आमच्या टिमच्या आशा सेविका, आरोग्य सेवक, कर्मचारी याकामी तत्पर आहेत. 
- डॉ. आर. एम. राऊत, 
वैद्यकीय अधिकारी 

कुटूंबीय, लहानमुले यांची काळजी घेण्याच्या उद्देशाने आम्ही शेतात राहण्याचा मार्ग निवडला आहे. 
- बाळू मोकाशे, 
ग्रामस्थ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT