mukhed 
मराठवाडा

शेतकऱ्यांची देणी मध्यवर्ती बँकेने ‘आरटीजीएस’ प्रणालीद्वारे द्यावी, कोण म्हणाले ते वाचा... 

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड ः जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांचे पैसे आरटीजीएस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनास दिल्या आहेत. गावनिहाय नियोजन करून संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वाटप केले जातील असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुदखेड येथील आढावा बैठकीदरम्यान सांगितले.

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा व तालुका प्रशासन प्रभावीपणे उपाययोजना करत आहे. शहर व तालुक्यात महसूल, गृह, आरोग्य यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी (ता.११) मुदखेडला भेट देऊन तालुका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनेचा आढावा बैठकीच्या माध्यमातून घेतला.

आस्था अनाथ बालक आश्रमासाठी धान्य वाटप
सर्वसामान्य गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात दिलासा देण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पाचशेच्या वर धान्याचे किट तालुका प्रशासनाच्या स्वाधीन करून प्रातिनिधिक स्वरूपात तहसील कार्यालयात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी गरजूंची आस्थेवाईकपणे चौकशी केली व शहरातील आस्था अनाथ बालक आश्रमासाठी प्राधान्याने पालकमंत्र्यांनी या वेळी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून धान्याचे वाटपही केले.

कारवाई करण्याचे ‘ऑन दि स्पॉट’ आदेश
शहरात व माळकौठा येथे अनधिकृतपणे मद्य विक्रेत्याविरुद्ध कारवाई व्हावी अशी बैठकीत एका युवकाने मागणी केली. त्यानंतर संबंधिताविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे ‘ऑन दि स्पॉट’ आदेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनास दिले. या वेळी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव पा.शिंदे नागेलीकर, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख, तहसीलदार दिनेश झाम्पले, काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पा.पवार निवघेकर, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जागिरदार, शहराध्यक्ष माधव पा.कदम, संचालक भीमराव पा.कल्याणे, मुख्याधिकारी रामराजे कापरे, कैलास गोडसे, बंदेअली पठाण, उत्तम चव्हाण, पोलिस निरीक्षक विश्वांभर पल्लेवाड, बारडचे पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, संजय कोलते आदींची उपस्थिती होती.

आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयास दोन रुग्णवाहिका देणार
शासन जनतेला योग्य ती मदत करण्यासाठी कटिबद्ध असून कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी व जनतेचे आरोग्य सुखदायी राहावे ही बाब लक्षात घेऊन आपल्या आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयास शहरी व ग्रामीण भागासाठी दोन रुग्णवाहिका देणार असल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT