वालसावंगी : बहरलेल्या पपईच्या फळबागेवर ट्रॅक्टर चालविताना. 
मराठवाडा

बहरलेल्या पपईवर चालविले ट्रॅक्टर : पहा Video

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - कृषी क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. फुलशेती, शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, भाजीपाला विक्रीला लागलेला ब्रेक आणि आता तर फळबागेलासुद्धा कोरोनाची झळ बसत आहे. शेतकरी यामुळे हताश आणि हतबल झाले आहेत. दरम्यान, विक्री होत नसल्याने एका शेतकऱ्यावर नाइलाजाने बहरलेल्या पपईवर ट्रॅक्टर चालविण्याची वेळ आली. 

पद्मावती (ता. भोकरदन) येथील शेतकरी रमेश तराळ यांनी नऊ महिन्यांपूर्वी आपल्या दीड एकर क्षेत्रात सुमारे ९०० पपईच्या झाडांची लागवड केली. राखलेली योग्य निगा, पाण्याचे नियोजन, केलेली मशागत यामुळे पपई बाग बहरलेली होती. मोठ्या प्रमाणावर पपई लगडली होती. यातून चांगले आर्थिक उत्पन्न निघण्याची आशा शेतकरी रमेश तराळ यांना होती.

सुरवातीला दहा-अकरा रुपये किलोप्रमाणे पपई विक्री झाली. नंतर ऐन पपई विक्रीच्या वेळी कोरोनाचा शिरकाव झाला. लॉकडाउन आणि संचारबंदी यामुळे पपई विक्री थांबली. स्थानिक व्यापारीदेखील पपई घेईना व बाहेर इतर ठिकाणीसुद्धा पपई विक्रीसाठी पाठविता येईना, अशी अवस्था झाली. शिवाय बाजारपेठ बंद यामुळे पपई विक्री करणे अशक्य बनले. शेतदेखील गुंतलेले होते. त्यामुळे शेतकरी रमेश तराळ यांनी पपई फळबागेवर ट्रॅक्टर चालवून ही फळबाग जमीनदोस्त केली आहे.

आता शेतात ते खरीप पीक घेणार आहेत. फळबाग लागवड, मशागत यासाठी मोठा खर्च त्यांना आला; मात्र तो देखील वसूल झाला नसल्याचे शेतकरी तराळ यांनी सांगितले. 

कोरोनामुळे पपईची विक्री करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत होते. वेळेवर व्यापारीदेखील मिळत नव्हता. आता तर कवडीमोल भावाने पपई विक्री होत होती. शिवाय खरीप हंगाम जवळ येत होता. आर्थिक फायदा होत नसल्याने मी पपई फळबागेवर ट्रॅक्टर चालविले आहे. लावलेला खर्च देखील वसूल झाला नाही. जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. 
-रमेश तराळ, शेतकरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flydubai Attack: 'त्या' पायलटला सोडण्यासाठी क्रू मेंबर्स झाले आक्रमक! इस्रायली प्रवाशांचा खळबळजनक दावा; विमानात नेमकं काय घडलं?

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT