वालसावंगी : तोडणीविना असलेले पानमळ्यातील नागवेली पाने. 
मराठवाडा

कोरोनामुळे थांबली पानमळ्यांतील पानविक्री  

विशाल अस्वार

वालसावंगी (जि.जालना) - कवडीमोल भाग, अस्मानी संकट, तर कधी रोगराई, गारपीट यामुळे हताश होऊन शेतकऱ्यांनी पानमळे काढून घेतले. आता अगदी बोटांवर मोजण्याइतके पानमळे शिल्लक आहेत. त्यातच आता कोरोनामुळे सर्वच पानमळ्यातील पानविक्री बंद असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे हाल व आर्थिक नुकसान होत आहे.

येथील पानउत्पादक शेतकरी पानांचे पेटारे विक्रीसाठी नागपूर, भुसावळ, पुणे, येथे पाठवीत असत. ही पाने विकून त्यातून ते दोन पैसे कमवत; मात्र आता गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागवेली पानांची विक्री थांबली आहे,

सर्व बाजार बंद आहे, निर्यात बंद आहे, त्यामुळे पानतांड्यात पाने तोडणीविना आहे. यामुळे उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

पानटपरीदेखील बंदच 

ग्रामीण भागात आजही मसाला पानाला, पानांचा विडा याला मागणी आहे, पानटपरी चालक हे पान तांड्यातून मोठ्या प्रमाणावर पाने विकत घेतात. यामुळे काहीप्रमाणात का होईना पानांची विक्री होत असे; मात्र आता तर पानटपऱ्यासुद्धा बंदच असल्याने पानांची विक्री बंदच आहे. 

खर्च जास्त 

पानतांड्यात पाण्याचे नियोजन करणे, योग्य निगा राखणे, औषध फवारणी करणे, मजुरांकडून खुडई करून घेणे, शिवाय अन्य खर्च असा बराच खर्च पानतांड्याला येत असतो; मात्र आता विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शासनाच्या मदतीची गरज 

वारंवार पानउत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावेच लागते आहे. रोगराई, वारा वादळ, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी, कवडीमोल भाग, यापैकी एकतरी संकट पानतांड्यावर येतेच. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. आजकाल पाणतांडे लावणे मोठे कठीण, तर दुसरीकडे शासनाकडून पानमळ्याला ना विमा कवच मिळते, ना नुकसानभरपाई. दुष्काळी अनुदानही मिळत नाही. त्यामुळे शासनाने इतर पिकांप्रमाणे पानमळ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT