पूर्णा (जि.परभणी) : ज्ञानेश्वर शिवाजी भालेराव व त्यांच्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. 
मराठवाडा

रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या बापलेकाचा करुण अंत, बहिणीची भेट राहिली

जगदीश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : रक्षाबंधनाच्या सणासाठी (Raksha Bandan) जाणाऱ्या बापलेकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू, तर एक महिला जखमी झाली. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे खुजडा गावावर शोककळा पसरली आहे. पूर्णा-ताडकळस रस्त्यावर कानडखेड शिवारातील बळीराजा हॉटेलजवळ रविवारी (ता.२२ ) दुपारी अपघात घडला. दुचाकी व पाण्याचा टँकरच्या या अपघातात ३२ वर्षीय तरुण ज्ञानेश्वर शिवाजी भालेराव व त्यांच्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. खुजडा (ता.पूर्णा) (Purna) येथील ज्ञानेश्वर भालेराव हे रक्षाबंधन सण असल्याने त्यांचा चार वर्षीय मुलगा साईनाथ व भावजयी गयाबाई प्रकाश भालेराव (वय २८ ) यांना सोबत घेऊन नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एकदर निळा येथे बहिणीकडे रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी जात होता. खुजडा येथून ते दुपारी बारा वाजता दुचाकी (एमएच २२ एके४१४) घेऊन निघाले.

पूर्णा-ताडकळस रस्त्यावरील कानडखेड शिवारातील बळीराजा हॉटेलजवळ समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनास चुकवण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर (एमएच ०४ सीजी ५५००) पाठीमागून त्यांची दुचाकी धडकली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीस्वार ज्ञानेश्वर भालेराव यांना डोक्यात व छातीत जोरदार मार लागला तर त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मुलगा साईनाथ तसेच भावजयी गयाबाई यांनाही डोक्यात गंभीर दुखापत झाली. परिसरातील शेतकरी व वाहनधारकांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने जवळच असलेल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु ज्ञानेश्वर यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. दरम्यान दोन जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले. उपचार सुरू असताना चार वर्षीय साईनाथ ज्ञानेश्वर भालेराव यांचाही मृत्यू झाला आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशीच सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या बापलेकाचा हा करूण अंत सर्वांना चुटपुट लावणारा व हृदय हेलावून सोडणारा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: महाराष्ट्र डेटा सेंटर हबच्या तयारीत! विकास प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर मोठे बदल! आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू होणार, तिकिटाचे दरही वाढणार; प्रवाशांच्या खिशाला फटका

Navi Mumbai: पिस्तूल, ६ जिवंत काडतुसे अन्..., अपघातग्रस्त कारमधून ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

कृष्णाईच्या लेकी मालिकेत स्टार प्रवाहची अभिनेत्री मुख्य भूमिकेत, जाणून घ्या संपूर्ण कास्ट आणि प्रसारणाची वेळ

Army Cheeta Helicopter Crashes: लडाखमध्ये मृत्यूला हरवून तीन अधिकारी बचावले! भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर डोंगरात कोसळले

SCROLL FOR NEXT