Umarga Accident News 
मराठवाडा

दुर्दैवी! उमरगा बायपासवर भरधाव ट्रकने १५ शेळ्या-मेंढ्यांना चिरडले; महिलांना दुःख अनावर, फोडला हंबरडा

अविनाश काळे

उमरगा (जि.उमरगा)  : शहराच्या बायपास रस्त्यावरून त्रिकोळी मोडवरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हैदराबादहून- सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने शेळ्या-मेंढ्याला चिरडल्याने १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. सहा) सायंकाळी घडली.


उमरगा शहरासाठी मध्यंतरी बायपास रस्ता करण्यात आला. परंतु, तो निकृष्ट पद्धतीने झालेला आहे. शहराच्या वस्तीला लागूनच रस्ता असल्याने नागरिकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. शिवाय या भागात अनेकांची शेती असल्याने शेतकरी, मजूर आणि जनावरांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. या मार्गावरून कोरेगाव, त्रिकोळी व मुळज गावाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडून जावा लागतो. मात्र, या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने आजवर जवळपास दहा अपघात झाले आहेत.


शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरग्यातील व्यंकट घोडके हे जवळपास ६५ शेळ्या- मेंढ्या घेऊन घराकडे चालले होते. यावेळी रस्ता ओलांडत असताना श्री. घोडके यांनी ट्रक चालकाला थांबविण्याचा इशारा केला. परंतु, चालकाने कसलीही पर्वा न करता ट्रक चालविला. यात जवळपास पंधरा शेळ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, संतापलेल्या नागरिकांनी काही वेळ रस्ता रोखून धरला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस निरीक्षक मुकुंद आघाव यांनी पळून गेलेल्या ट्रक चालकावर लवकरच गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगून लोकांची समजून काढली. त्यामुळे दीड तास ठप्प झालेली वाहतूक रात्री सव्वा नऊ वाजता सुरु झाली.

महिलांचा हंबरडा
या दुर्दैवी घटनेनंतर मोठ्या कष्टाने जोपासलेल्या शेळ्या- मेंढ्यांच्या मृत्यूमुळे श्री. घोडके व त्यांच्या कुटुंबीयांतील महिला नातेवाइकांनी हंबरडा फोडला होता. मृत्यूमुखी पडलेल्या मेंढ्याजवळ बसून महिलांचा सुरु असलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani GNM Paper Leak : परभणीत नर्सिंगचा पेपर फुटला, सुपरवायझरने बहिणाला WhatsApp वर प्रश्नपत्रिका पाठवली अन्... चौघांना अटक

IND VS SL 2ND TEST : हाताला पट्टी, मनात जिद्द! Rishabh Pant ला मैदानावर पाहून श्रीलंकन थरथरले; त्यात थोडक्यात विकेट हुकल्याने आणखी घाबरले Video

ST Bus : सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला! एसटीच्या प्रासंगिक करार भाड्यात ११ ते १९ रुपयांनी वाढ

Marathi News Live Updates : पुण्यातील माणिक बागेत अपघात; युवतीचा मृत्यू

iPhone Fold: Appleचा पहिला foldable iPhone होणार लाँच! 2 महत्त्वाचे फीचर्स असणार गायब; पाहा किती असेल किंमत..

SCROLL FOR NEXT