images
images 
मराठवाडा

पन्नास शेतकऱ्यांची फळ लागवडीतून ‘काशी’

सकाळ वृत्तसेवा

गिरगाव, (जि.हिंगोली) ः वसमत तालुक्यातील गिरगाव येथील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी ऐंशी एकरावर काशीफळाची लागवड केली. परंतु, लॉकडाउनमुळे त्‍याची विक्री करता येत नसल्याने ही फळे तोडणीअभावी वेलालाच असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गिरगाव येथील गंगाधार नादरे, बापूराव रायवाडे, सोपान कऱ्हाळे, माधवराव केंचे, मुंजाजी नादरे, रामजी नावडे, वसंतराव कऱ्हाळे यांच्यासह तीस ते पस्‍तीस शेतकऱ्यांनी नव्यानेच काशीफळाची लागवड केली आहे. 

विक्री करण्यासाठी अडचणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउन, संचारबंदीमुळे नियमित सुरू असणाऱ्या बाजारपेठा बंद झाल्या आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना काशीफळाची तोडणी करून त्‍याची विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वेलालाच ही फळे तशीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मात्र आर्थिक फटका बसला आहे.

लागवड, खत, फवारणीचा खर्च मोठा
काशीफळाची लागवड, खत, फवारणी आदी कामांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. या फळाला सर्वात जास्त मागणी हैदराबाद, उतरप्रदेश, गुजरात राज्यात असून हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुध्दा त्‍याचा उपयोग केला जातो. पण आता सीमाबंदीमुळे व्यापारी देखील खरेदीसाठी येत नसल्याने गिरगावातील ऐंशी एकरावरील काशिफळ शेतात वेलालाच पडून ते जागेवरच खराब होत आहेत. दरम्यान या पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.

जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना फटका
आत्तापर्यंत मागील दोन महिन्यात लॉकडाउन सुरु असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव न मिळणे, वाहतूक व्यवस्था नसल्याने माल जागेवरच पडून राहणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे राज्यात आणि परराज्यात जाणाऱ्या शेतमालाची आवक, जावक थांबली आहे.  

शासनाने पंचनामे करण्याची मागणी 
यावर्षी नव्यानेच काशीफळाची लागवड केली होती. माझ्यासह इतर चाळीस शेतकऱ्यांनीदेखील काशीफळ लावले आहे. राज्यापेक्षा परराज्यात त्‍याला चांगली मागणी आहे. मात्र, ऐन तोडणीच्या वेळी ‘कोरोना’चे संकट आल्याने सीमाबंद झाल्या. यामुळे काशीफळाची विक्री करता आली नाही. यासाठी प्रत्‍येक शेतकऱ्यांना मोठा खर्च आला आहे. तोडणीअभावी ही फळे शेतातच खराब होत आहेत. शासनाने याचे पंचनामे करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. 
- गंगाधर नादरे, शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT