Sheep died in parbhani esakal
मराठवाडा

धक्कादायक! परभणीत विषारी वनस्पती खाल्ल्याने ५० मेंढ्यांचा मृत्यू

तीन शेतकरी आपल्या २२६ मेंढ्यांना घेऊन परभणी तालुक्यातील भारस्वाडा शिवारात आले आहेत.

गणेश पांडे

परभणी : तालुक्यातील भारस्वाडा येथे विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे ४५ ते ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला. विषारी वनस्पती खाल्ल्यामुळेच त्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने केला असून अन्य १७५ पशुसंवर्धन विभागाद्वारे उपचार सुरु आहेत, अशी माहिती दिली. अंबाजोगाई (जि.बीड) येथील तीन शेतकरी आपल्या २२६ मेंढ्यांना घेऊन परभणी तालुक्यातील भारस्वाडा शिवारात आले आहेत. (Fifty Sheeps Did In Parbhani Taluka Due To Toxic Trees)

नियमितपणे त्यांनी मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या असता मेंढ्यांनी (Sheep) विषारी वनस्पती खाल्ली. त्यामुळे मेंढ्यांना विषबाधा होऊन ४५ ते ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला. मेंढ्यांच्या मृत्यूची माहिती शेतकर्‍यांनी परभणी (Parbhani) जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतर पशुसंवर्धन विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत उपचार सुरु केले.

सद्यःस्थितीला १७५ मेंढ्यांवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : विद्या सहकारी बँकेच्या सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर

SCROLL FOR NEXT