Photo
Photo 
मराठवाडा

शिवजन्मोत्सवाच्या तारखेसाठी झगडाव लागलं- का ते वाचा

सकाळवृत्तसेवा

नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज हे आठरापगड रयतेचे राजे आहेत. जगातला सर्वोत्तम, आदर्श, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्यापोटी फेब्रुवारी (ता. १९) १६३० रोजी सायंकाळी किल्ले शिवनेरीवर झाला. हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य असताना शिवजन्मोत्सवाच्या तारखेसाठी झगडाव लगलं, असे प्रतिपदान ॲड. वैशाली डोळस यांनी येथे केले. 

मराठा सेवा संघ प्रणित इतर शाखांच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने बुधवारी (ता. १९) शहरातील नवा मोंढा मैदान येथे शिवव्याख्यात्या ॲड. वैशाली डोळस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षा विद्या पाटील चव्हाण, राजश्री पाटील, स्वागताध्यक्ष संकेत पाटील, भगवान कदमख आदींसह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

रयतेच्या स्वराज्य निर्माणासाठी​ 

पुढे बोलताना सौ. डोळस म्हणाल्या की, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल सवंगडी, मावळे, रामोशी, कोळी, मांग, महार, माळी, कुंभार, न्हावी, मरठे, कुणबी, लोहार, धनगर, मुसलमान अशा सर्व जाती-जमातींतील होते. शिवजन्मपूर्वीच्या काळातही राजे होते; पण राजमाता जिजाऊंनी रयतेच्या स्वराज्य निर्माणासाठी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना शहराजीराजे भोसले यांचा पराक्रम व राजमाता जिजाऊंची प्रेरणा होती. त्यामुळं स्वराज्य निर्माण झालं. अंधाराला दिवा मिळत नव्हता, माणसाशिवाय कुठलंच काम होत नव्हतं, अशा काळात राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्र, कर्नाटक पिंजून काढला. राजमाता जिजाऊ या विचारण करणाऱ्या स्त्री आहेत. त्या काळात सरदारांना राजे म्हटलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना जिजाऊंच स्वप्न राजा बनवनं नव्हत; तर छत्रपती घडवून रयतेच्या हृदय सिहांसनावर विराजमान होणारा होण्याच होत. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या हृदय सिहांसनावर विराजमान आहेत. 

शिवचरित्र वाटप करण्याची अवश्यकता​
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या संविधानाने मिळालेल्या नोकरीची आरती  घालताना आजची स्त्री दिसून येते. चमचा-वाटी, साडी-चोळीपलीकडे हळदी- कुंकू कार्यक्रम नाही, त्यासाठी पात्रता काय, तर ती स्त्री सौभाग्यवती असली पाहिजे. विधवांना निमंत्रण द्यायचं नाही. स्त्रीबद्दलचा हा विरोधाभास पहिल्यांदा अम्ही महिलांनी गाडला पाहिजे. हळदी - कुंकू कार्यक्रमात विधवांना निमंत्रित करून चमचा- वाट्या, साडी- चोळी वाटण्यापेक्षा शिवचरित्र वाटप करण्याची अवश्यकता आहे. शिकल्या सवरल्या महिलांनी पहिल्यांदा अंधश्रद्धेच्या बेड्यातून मुक्त व्हाव लागणार आहे. आजचे शिवाजी आणि संभाजी घडवायचे असतील तर पहिल्यांदा आम्हाला जिजाऊ व्हाव लागणार आहे. 

महामानवांचे विचार आचरणात आणायचे आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतो, तेव्हा महिलांचे नेतृत्व करणाऱ्या स्त्री या बाहेर येत नाहीत. कालपरवा इंदुरीकर महाराज यांनी मनुस्मृतीमधील काही ओळी मांडताच मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची भाषा करणाऱ्या तृप्ती देसाई हिंगणघाट (जि. वर्धा) येथील प्रकरणात कुठ निषेध करताना दिसून आल्या नाहीत. आपणास शिवभक्त नाही, तर अनुयायी होऊन महामानवांचे विचार आचरणात आणायचे आहेत. आंबे खाल्याने मूल होत असल्याची खुळचट मेंदूतून हिंदुस्थान तर सिमेंट फॅक्टऱ्या, उद्योजकांना आनखी श्रीमंत करण्यासाठी शायनिंग इंडियाची संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

स्त्रियांनी पुढकार घेण अवश्यक-
आपल्याला उत्तर शोधायची आहेत एका रात्रीत रेल्वे खासगी कशी झाली, एअर इंडिया विकली, एलआसी विकली, मधल्या काळात किल्ले विकायला काढले. तुम्ही काय काय विकणार आहात? आमच्या मुलांना कुठ, किती नोकऱ्या मिळाल्या, अशा समर्पक प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आचरणात आणून वेळप्रसंगी प्रतिइतिहास लिहण्यापर्यंत काम करावं लागणार आहे. यासाठी स्त्रियांनी पुढकार घेण अवश्यकता आहे. कायद्याला जर सन्मान प्राप्त करून द्यायचा असेल, तर आधी कायद्याने माणसाला सन्मान प्राप्त करून दिला पाहिजे, तरच कायद्याला सन्मान मिळतो.’’
 छत्रपती शिवाजी महराज यांची जयंती (ता. १९) फेब्रुवारी रोजी तारखेनुसार साजरी करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT