Crime News esakal
मराठवाडा

Chh. Sambhajinagar : मोबाईलमध्ये महिलेचे शुटिंग केल्याच्या आरोपातून तुंबळ हाणामारी; परस्पर तक्रारी दाखल

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : शेजारी राहणाऱ्या महिलेने मोबाईलमध्ये शुटिंग केल्याच्या कारणावरुन दोन कुटूंबात हाणामारी झाली. या घटनेत एकमेकांना मारहाण करत जखमी केले. ही घटना १३ जून रोजी एन-७, अयोध्यानगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही कुटूंबातील परस्परांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत फिर्यादी महिला आणि तिचा मुलगा महेश माने हे जेवण करुन घराबाहेर फिरत असताना शेजारी राहणाऱ्या महिलेने महेश याला तु मोबाईलमध्ये माझ्या मुलीचे व्हिडीओ का शुट करतो असे म्हणाली.

त्यावरुन फिर्यादी महिलेसह तिचा मुलगा महेश हे समजावून सांगत असताना आरोपी महिला, आरोपी वैभव भिमराव आडे, एक महिला अशा चौघांनी फिर्यादी महिलेसह तिच्या मुलाला आरोपीच्या घरासमोर नेत लोखंडी रॉडने मारुन डोके फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आडेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या कुटूंबातील महिलेने केली विनयभंगाची तक्रार

याच घटनेतील दुसऱ्या कुटूंबातील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती घरासमोर कुत्र्याला भाकरी टाकत असताना महेश माने हा ममोबाईलमध्ये फिर्यादी महिलेचे फोटो काढत असल्याने तिने महेश याला ‘तु माझे फोटो का शुट करत आहेस’ असे म्हणाली. त्यावरुन आरोपी महेश आणि त्याच्या आईने फिर्यादीला शिवीगाळ केली.

दरम्यान फिर्यादी समजावून सांगत असताना महेश माने, उमेश माने आणि इतर दोन महिला अशा चारजणांनी फिर्यादीला मारहाण केली. त्याचवेळी फिर्यादीचा भाऊ वैभव आडे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यालाही लोखंडी रॉडने माराहाण केली.

तसेच आरोपी महेश आणि उमेश या दोघांनी फिर्यादी महिलेच्या अंगातील कपडे ओढून तिचा विनयभंग केला, तसेच दोघांनीही फिर्यादीच्या कुटूंबियांना आम्ही तुम्हाला पेट्रोल टाकून जाळून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दोन्ही कुटूंबियांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Ekadashi : "बा विठ्ठला, राज्यातील प्रत्येक शेतकरी सुखी राहू दे..."; शासकीय महापूजेनंतर CM फडणवीसांचे पांडुरंगाला साकडे

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : CM देवेंद्र-अमृता फडणवीसांच्या हस्ते विठूरायाची महापूजा; मुख्यमंत्र्यांनी काय मागितलं मागणं?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

SCROLL FOR NEXT