hingoli
hingoli 
मराठवाडा

हिंगोलीत एमआयएम अन् भाजप समर्थक भिडले

सकाळवृत्तसेवा

हिंगोली : हिंगोली मध्ये एम् आय एम् चे पदाधिकारी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान मारहाणीची घटना शनिवारी (ता. 3) घडली आहे. 

या हाणामारीत दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.  हिंगोली शहरालगत गारमाळ भागात एम. आय. एम. चे जिल्हाध्यक्ष शेख  बुरहान पहेलवान व भाजपचे अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी हमीद प्यारेवाले यांच्या समर्थकांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आज सकाळी हा वाद उफाळून आला. शाब्दीक चकमकीनंतर हाणामारीला सुरुवात झाली. हातात पडेल त्या साहित्याने मारहाण सुरू होती. दोन्ही गटाकडील शंभर ते दिडशे लोकांनी 
एकमेकांच्या घरावर तुफान दगडफेक करत प्रचंड गोंधळ घातला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक राहूल मदने, पोलिस निरीक्षक उदयसिंह चंदेल यांच्या पथकाने  घटनास्थळी धाव घेतली. दंगा काबू पथक देखील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये आली आहे.मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तीन ते चार जणांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.  यातील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नांदेडच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT