Crime News  
मराठवाडा

Crime News : अखेर 'त्या' खुनाचा उलगडा झाला; पोटच्या मुलानेच वडिलांना संपवलं, कारण...

किशन बारहाते

मानवत, (परभणी) : तालुक्यातील ताडबोरगाव खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून वडील घर खर्चाला पैसे न देता दारू पिण्यात पैसे उडवत असल्याचा राग मनात धरून मुलानेच वडिलांचा खून केल्याचे तपासात उघडीस आले आहे. या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात २४ एप्रिलच्या रात्री दत्तात्रय भोकरे यांच्या मानेवर व डोक्यात वार करून खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत या प्रकरणाची पार्श्वभूमी तपासली असता मयताचा लहान मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे (वय २८ ) हा वडिलांसोबत आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद घालत असल्याची माहिती मिळाली होती.

मंगळवारी दुपारी परमेश्वर याला तपासासाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता सार्वजनिक बांधकाम विभागात गँगमन म्हणून काम करणारे वडील दत्तात्रय भोकरे यांना दारूचे व्यसन होते. ते आपल्या मित्रांसोबत दारू पिण्यात पैसे खर्च करीत होते. वडील घर खर्चाला रक्कम देत नसल्याने मुलगा परमेश्वर याच्या सोबत वाद होत होता.

नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री गावाजवळील शेतात ते दारू पीत बसलेले असताना परमेश्वर हा रागाच्या भरात एका शेत आखाड्यावरील कुऱ्हाड घेऊन घटनास्थळी गेला व मानेवर व डोक्यात वार करून वडिलांचा खून केला. याची कबुली परमेश्वरने दिली आहे. या प्रकरणी मानवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय बिझनेस सेंटर उभारणार! CIDCO चा मोठा प्रकल्प; व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना

Paper Leak Case: १० लाखांत कुरिअरने आला, १५ लाखांना विकला अन्... महाराष्ट्रात NEET चा पेपर कसा फुटला? धक्कादायक खुलासा

Dunes League T20 : क्रिकेटच्या कक्षा रुंदावतायेत! सौदी अरेबिया फ्रँचायझी लीगच्या मैदानात; युवराज सिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स, गतविजेत्या RCBच्या ताफ्यात बदल! प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'हे' डाव यशस्वी ठरणार की...?

Pune Bomb Case: यूट्यूबवरून बॉम्ब बनवायला शिकला, फक्त ४०० रुपयांत उडवली पुण्याची झोप; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT