संग्रहित चित्र. 
मराठवाडा

सार्वजनिक स्थळी थुंकल्यास हजार रुपये दंड 

उमेश वाघमारे

जालना - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. 

सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्याचे प्रथम आढळल्यास १ हजार रुपये दंडाची शिक्षा होणार आहे. सार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न वापरणे, नाक व तोंड सुरक्षितपणे पूर्ण झाकलेले नसल्यास ५०० रुपये दंड होणार आहे.

दुकानावर, फळ, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर न राखणे, विक्रेत्यांनी मार्किंग न करणे यासाठी २०० रुपये, तर आस्थापना मालक, दुकानदार, विक्रेता यांना २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक स्थळी रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय आदी ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास १ हजार रुपये दंड, एखादी व्यक्ती दुचाकीवरून वैयक्तिक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा, औषधी घेऊन जात असल्याची बतावणी करून अनावश्यक फिरत असल्यास १०० रुपये दंड आकारले जाणार आहेत. 

हे दंड प्रथम गैरकृत्य करताना आढळल्यास करण्यात येईल; मात्र दुसऱ्यांदा गैरकृत्य करताना आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे कळविले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

Hasan Mushrif Kolhapur ZP Political Strategy : बहुमत असूनही पेच? पण मुश्रीफांनी करून दाखवलं 'अशक्य ते शक्य'; कसं जुळवलं सत्तेचं समीकरण? वाचा सविस्तर...

Latest Marathi News Live Update : कल्याण मध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य मिरवणूक

Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Crime News : बॅनरवर फोटो खाली का? नाशिकमध्ये नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून रात्रभर डांबले

SCROLL FOR NEXT