nanded
nanded 
मराठवाडा

घराला आग लागून एकाच कुटुंबातील  तिघांचा होरपळून मृत्यू

विनोद आपटे

मुक्रमाबाद (नांदेड) - दिवसभर कामे करून घरात गाढ झोपेत असताना घराला अचानक आग लागून पती, पत्नी व मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मुक्रमाबाद येथे सोमावार दि १८ रोजी मध्ये रात्री घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत असून यातून आकरा वर्षीय मुलगा बालंबाल बचावला आहे. 

मुक्रमाबाद येथील ऐनुल्लाशहावल्ली येथील माळरानावर  लाकडाचे व गवताची सावली करून त्याठिकाणी चारही बाजूंनी टिन पञे मारून घर करून रहात होते. या घरा शेजारीच असलेल्या चुलीतील असलेली लहानशी ठिणगी वा-याने  या  घरावर पडून आगीने पेठ घेतला आग विझविण्यासाठी आसपास कोणीही नसल्यामुळे व घराला चारही बाजूंनी लाकडाचे व गवताच्या कुडानी वेढलेले असल्यामुळे काही वेळातच हे, घर अगीच्य भक्षस्थांनी पडले. आग ज्यावेळी लागली. त्यावेळी घरातीलघरातील सगळेचजण गाढ झोपेत होते. त्यावेळी घराला आग लागल्याचे पत्नीच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. दारात झोपलेल्या आपल्या बारावर्षीय करण पवार या मुलाला त्याच अवस्थेत घरा बाहेर आणून सोडले. व आत असलेल्या पतीला व मुलीला वाचविण्यासाठी परत घरात गेली. त्यावेळी माञ आगीने चांगलेच रौद्ररूप धारन केले. होते. घरात आपला  पती व मुलीचा जीव वाचविण्यासाठी गेली.आणि अगीत अडकून पडली. जळती लाकडे, व टिन पत्रे अंगावर पडल्याने त्यात पती व्यंकट तिम्मा पवार, वय ३९ पत्नी रेखाबाई व्यंकट पवार ,वय ३५ वर्षे व काजल व्यःकट पवार वय आठ वर्षे तिघांचा व एका शेळीचा या अगीत जाग्यावरच होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर माधव चन्नप्पा वलेपवाड यांनी दिलेल्या लेखी माहीती वरून मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास साहाय्याक पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, बिट जमादार किसनराव चिंतोरे, करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT