मराठवाडा

...या जिल्हा परिषदेच्या शाळेला लागली आग

सकाळ वृत्तसेवा

औंढानागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्‍यातील गढाळा येथील जिल्‍हा परिषद शाळेस सोमवारी (ता.सहा) सकाळी साडेसहा वाजता अचानक आग लागून संगणक कक्षासह शैक्षणिक साहित्य जळून अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. ग्रामस्‍थांनी विद्युत मोटार लावून आग आटोक्‍यात आणली. 

औंढा नागनाथ तालुक्‍यातील गढाळा येथे जिल्‍हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी सकाळी लवकर शाळेत येतात. नेहमी प्रमाणे हे विद्यार्थी सोमवारी सकाळी लवकर अभ्यासासाठी शाळेत आले होते. सर्व विद्यार्थी अभ्यास करून थोडावेळ बाहेर आले. त्‍यांनतर अचानक शाळेला आग लागली. त्यामुळै विद्यार्थी गोंधळून गेले. विद्यार्थ्यांचा आवाज एकून ग्रामस्‍थांनी शाळेकडे धाव घेतली. तेव्हा शाळेला आग लागल्याचे दिसले. 

विद्युत मोटार लावून आग विझविली

त्यानंतर गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग वाढत होती. त्यामुळै गावाशेजारी असलेल्या शेतातील विद्युत मोटार लावून शाळेपर्यंत पाइप टाकण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत शाळेतील संगणक व शैक्षणिक साहित्य जळून जळून खाक झाले. यामध्ये अंदाजे दोन लाखांचे नुकसान झाल्याचे मुख्याध्यापक कृष्णा गायकवाड यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. 

विद्यार्थी बालंबाल बचावले

अभ्यासासाठी विद्यार्थी लवकर शाळेत येतात. सोमवारीही आले होते. मात्र, काही वेळ अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी वर्गाबाहेर आले. याच वेळी आग लागली. अन्यथा मोठा अनर्थ घटला असता. या आगीमुळे पालकांनी शाळेकडे धाव घेतली. त्यानंतर सर्व गावकरी शाळेत जमा झाले. त्यानंतर आग विझविण्यासाठी जमेल त्या साहित्याने पाणी आणत आग विझविण्यासाठी मदत केली.

हेही वाचा... महिलेचा खून करून ८२ हजारांचे दागिने लांबविले

हिंगोली: सेनगाव तालुक्‍यातील तळणी शिवारात शेळ्या चारण्यास गेलेल्या एका महिलेचा गळा आवळून तिचा खून केला. तसेच अंगावरील सोन्या - चांदीचे ८२ हजार दोनशे रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना शनिवारी (ता. चार) घडली. या प्रकरणी नरसी पोलिस ठाण्यात रविवारी (ता. पाच) गुन्हा दाखल झाला आहे.

शेळ्या चारण्यासाठी गेली होती महिला

नरसी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तळणी येथे मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय ६५) या शनिवारी (ता.चार) शंकर प्रभू कोरडे यांच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी कोणीतरी तिचा गळा आवळून खून केला. तसेच अंगावरील ८२ हजार दोनशे रुपयांचे सोन्या - चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी नागोराव पांडुरंग कोरडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नरसी पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका, आता एसटीचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले संकेत...

Kolhapur Ministers Convoy Stopped : कोल्हापुरातील मंत्र्यांचे दिशादर्शक पाऊल; मुश्रीफ, आबिटकर, क्षीरसागरांनी वाहनांचा ताफा नाकारला, आमदार, खासदार बंद करणार का?

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

SCROLL FOR NEXT