औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात असलेल्या मोटार गॅरेजमध्ये सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण आग लागली.
औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात असलेल्या मोटार गॅरेजमध्ये सोमवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण आग लागली. 
मराठवाडा

चिकलठाणा परिसरात मध्यरात्री भीषण आग

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - चिकलठाणा परिसरात असलेल्या मोटार गॅरेजमध्ये सोमवारी (ता. १३) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये वीस ते पंचवीस वाहने जळून खाक झाल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी वर्तविला आहे. दरम्यान, सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. रात्री दीडनंतरही आग विझविण्याचे काम सुरू होते. 

चिकलठाणा भागात असलेल्या मोटार गॅरेजचे पाच ते सात वर्कशॉप या आगीत जाळून खाक झाले आहेत. सोमवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये वर्कशॉपमध्ये उभी वीस ते पंचवीस वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रात्री एकपर्यंत ही आग आटोक्‍यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी महापालिका, एमआयडीसीचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून, जालना शहरातून येणारा रस्ता बंद करण्यात आला होता. आगीच्या तावडीत सापडणारी वाहने वाचविण्यासाठी गॅरेजवाल्यांची धडपड सुरू होती. क्रेनच्या साहाय्याने वाहने काढण्याचा प्रयत्न सुरू असताना अनेक वाहनांमधून स्फोटांचा आवाज येत होता. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : 'ईव्हीएम हॅक करतो' म्हणत अंबादास दानवेंकडे अडीच कोटींची मागणी; एक जण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT