फोटो 
मराठवाडा

फटाका तोंडात फोडला..अन् असे घडले...

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जिल्हा बीड) : येेेथील रेल्वे स्थानकावर सोमवारी (ता.२३) डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पुर्णा- हैद्राबाद ही रेल्वे स्थानकात आली. यावेळी एका युवकाने (वय १९) रेल्वेच्या बाथरूममध्ये जावून स्वतः च्या तोंडात सुतळी बाँम्ब (फटाका) वाजवल्याने गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या त्या बोगीत मोठा आवाज झा आणि सर्वत्र धावाधाव पहायला मिळाली. जखमी झालेला युवक हा जागीच खाली पडला. त्याला तात्काळ परळी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. 

परळी रेल्वे स्थानकावरून सय्यद अक्रम सय्यद अहमद (वय १९) रा. वाघाळा ता. पाथरी (जिल्हा परभणी) हा सकाळी दहाच्या सुमारास पुर्णा- हैद्राबाद या रेल्वेने हैद्राबादकडे आपल्या आई सोबत जात होता. युवकाने येथील स्थानकात रेल्वे थांबली असताना आईला बाथरुमला जातो असे सांगून रेल्वेच्या बाथरूममध्ये जावून स्वतः च्या तोंडात फटाका ठेवून पेटवला तो फुटला व हा युवक गंभीर जखमी झाला. कशाचा आवाज झाला म्हणून प्रवाशांनी बाथरुमकडे धाव घेतली. हा युवक जखमी अवस्थेत आढळला.

अंबेजोगाई रुग्णालयात उपचार सुरू

तात्काळ या युवकाला उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आंबेजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात बराच वेळ प्रवाशामध्ये घबराट उडाली होती. दरम्यान रेल्वेने कोणतेही स्फोटक पदार्थ घेऊन प्रवास करता येत नाही. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहे. तो युवक मनोरुग्ण आहे का किंवा आणखी काही कारण याचा तपास लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बल करीत आहेत.

फटाका होता की अन्य काही स्फोटक पदार्थ

रेल्वे प्रवास करतांना कुठलाही ज्वलनशिल किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येत नाही. हे माहित असतांना सय्यद अक्रम याने फटाका सोबत कसा नेला. याबद्दल तर्क वितर्क व्यक्त केल्या जात आहेत. घटना घडल्यानंतर लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व जवानांनी त्या डब्‍याची कसुन चौकशी सुरू केली. जवळपास एक तास रेल्वे परळी स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली होती. जखमी अक्रमवर अंबेजोगाई येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला सध्या बोलता येत नसल्याने त्याने फटाका का अन्य स्फोटक पदार्थ तोंडात फोडला याबद्दल सध्या पोलिसांच्या हाती काही माहिती मिळाली नाही. याप्रकरणी मात्र परळी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT