file photo 
मराठवाडा

नांदेडात पुन्हा गोळीबार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले होते. एवढेच नाही तर एक गुन्हेगार पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता. आता शहर व जिल्हा शांत राहिल असा निश्‍व: स पोलिसांनी टाकला होता. मात्र सोमवारी (ता. नऊ) रात्री बाफना परिसरात एका व्यावसायीकावर पुन्हा गोळीबार करण्यात आला. यात मात्र कुठलीही जीवीत हाणी झाली नाही. या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूध्द मंगळवारी (ता. १०) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बाफना परिसरात ड्रायव्हींग स्कुल चालक इंद्रपालसिंग भाटीया हे आपल्या दशमेशनगर भागातील आरतीया कॉम्पलेक्समधील कार्यालयात सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे बसले होते. यावेळी तोंडावर पट्टी बांधून दोघेजण त्यांच्याजवळ आले. ‘भाई का फोन क्यु नही उठाते’ म्हणून त्यांनी हवेत पिस्तुलातून गोळीबार केला. यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. या घटनेनंतर भाटीया हे भयभीत झाल्याने त्यांनी हा गंभीर प्रकार पोलिसांना कळविला नाही. त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. मात्र मंगळवारी (ता. १०) सकाळी त्यांनी इतवारा पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

वरिष्ठ पोलिस अधिकार घटनास्थळी

पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, इतवारा पोलिस ठाण्याचे प्रदीप काकडे, वजिराबाद पोलिस ठाण्याचे संदीप शिवले यांनी घटनास्थळ गाठले. परिसराची पाहणी केली. यानंतर गोळीबार झाल्याचे अन्य व्यापाऱ्यांना समजले. त्यांच्य दहशतीचे वातावरण पसरले आहे. यानंतर इंद्रपालसिंग भाटीया यांच्या फिर्यादीवरुन अनोळखी दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागरिकांनी भयभीत होऊ नये

हा प्रकार श्री. भाटीया यांनी रात्रीच सांगितला असता तर नाकाबंदी करून आरोपींच्या मुसक्या आवळता आल्या असत्या. मात्र त्यांनी रात्री पोलिसांना का सांगितले नाही हे मात्र समजु शकले नाही. मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनावर पोलिसांनी नियंत्रण मिळविले होते. फरार व पाहिजे आरोपींच्या मुसक्या आवळून अनेकांना कारागृहात टाकले आहे. नांदेड पोलिसांची धास्ती गुन्हेगारी जगतातील लोकांनी घेतली असली तरी या घटना पुन्हा घडू नये व व्यापाऱ्यांनी पोलिसांना वेळेत कळवावे असे आवाहन श्री. मगर व श्री. राठोड यांनी केले आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेत हसन मुश्रीफांनी, सतेज पाटलांची साथ सोडली; जाहीर सभेत सांगितलं

Mahashivratri: ताजमहाल की 'तेजोमहल'? महाशिवरात्रीला मोफत प्रवेशाची मागणी; काय आहे या वादाचा इतिहास ?

Bhushan Gavai : 'या' स्वातंत्र्यवीराच्या नावे दिला जाणारा सामाजिक पुरस्कार Supreme Court चे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांना जाहीर

Sunil Tatkare : अजितदादांच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला; राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत शशिकांत शिंदेंच्या लेखावर तटकरेंचा आक्षेप

पाच वर्षांपूर्वी ज्या 'खतरनाक' टेक्नॉलॉजीला जगाने थांबवलं; त्यालाच चष्म्यात लपवून आणत आहे मेटा? अनोळखी लोकांनाही कळेल तुमच नावंं

SCROLL FOR NEXT