छोटा चोर कावळा 
मराठवाडा

येलदरी धरण परिसरात मराठवाड्यात प्रथमच 'या' पक्षाचे दर्शन

छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरीकाळा पिसारा, लांब, अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नर पक्षाला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते.

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशयाच्या परिसरात शुक्रवारी (ता. २१) अतिशय दुर्मिळ असणारा समुद्री छोटा चोर कावळा आढळून आला. वनरक्षक तथा पक्षीमित्र गणेश कुरा यांच्या मते मराठवाड्यात या कावळ्याचे ( Lesser Frigate Bird ) प्रथमच दर्शन झाले. धरणाच्या जलाशयाच्या (Yeldari dam area) परिसरात नेहमीपेक्षा वेगळा पक्षी हवेत विहार करत असल्याचे शुक्रवारी सकाळी कुरा यांच्या दृष्टीस पडला असता त्यांनी या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करुन निरिक्षण केले असता तो समुद्री छोटा चोर कावळा असल्याचे समजले. (first- time- in Marathwada- 'this' -party- appeared- Yeldari -dam -area)

छोटा चोर कावळ्याचे इंग्रजी नाव Lesser Frigate Bird तर शास्त्रीय नाव फ्रीगाटा ऐरिएल आहे. फ्रीगाटे बर्ड कुटूंबातील फ्रेगेटिडाईचा कुळातील समुद्रपक्षी असून त्याची लांबी सुमारे ७५ सेमी (३० इंच) असते. ही फ्रिगेटबर्डची सर्वात लहान प्रजाती आहे. हा पक्षी भारतीय आणि प्रशांत महासागराच्या तसेच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्‍यावरील उष्णकटिबंधीय वातावरणात वास्तव्यास असतो.

हेही वाचा - कोरोनाच्या परिस्थितीत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा रद्द करा अशी मागणी होत होती

छोटा चोर कावळा एक हलका अंगभूत समुद्री पक्षी आहे. ज्यात तपकिरीकाळा पिसारा, लांब, अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असते. नर पक्षाला एक लाल रंगाची सामान्य पिशवी असते. आणि जोडीदारास आकर्षित करण्यासाठी तो त्यास फुगवितो. मादी नरापेक्षा किंचित मोठी असते. फ्रिगेट बर्ड्स समुद्राच्या पृष्ठभागावरुन अनेकदा उडणारे मासे त्यांचे भक्ष्य असते. भारतात या पक्ष्याच्या ई- बर्डनुसार खूप कमी नोंदी आहेत. तर येलदरी धरणाच्या जलाशय परिसरात तो दिसणे ही मराठवाड्यातील पहिलीच नोंद आहे. पक्षीमित्र, पक्षी अभ्यासकांसाठी खुप म्हत्वाची नोंद असल्याचे पक्षीमित्र कुरा यांनी सांगितले. त्यांच्या मते तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने तो येलदरी धरणाच्या परिसरात आला असावा.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT