Marathwada Village Girl Dhanshree Patil Shines in NEET 2024 esakal
मराठवाडा

NEET Success Story : आई-वडिलांनी केली मोलमजुरी, लेकीने फेडले पांग ; बनणार गावातली पहिली डॉक्टर

Marathwada News : मेहनत व बुद्धिमत्तेवरच आपल्याला यश मिळविता येते : धनश्री पाटील

Saisimran Ghashi

नायगाव : कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती या ओळींप्रमाणे एक यशोगाथा घडली आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा ‘एनईईटी-यूजी २०२४ च्या परिक्षेत सातत्यपूर्ण अभ्यास करून तालुक्यातील रातोळी येथील धनश्री पाटील हिने ७२० पैकी ६६१ गुण मिळविले.

सर्वसामान्य कुटुंबातील पाटील परिवाराने पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न त्यांच्या मुलीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. विशेष म्हणजे ती गावातील पहिली महिला डॉक्टर होणार आहे.धनश्री पाटीलचे हे यश ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रेरणा देणारे असून गरिबांचीही मुले डॉक्टर होऊ शकतात हे तीने दाखवून दिल आहे.

तालुक्यातील रातोळी येथील नराशाम विघालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतलेल्या धनश्रीने हे यश संपादन करून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.शिक्षण हे कोणत्याही माध्यमातून व शाळेतून घेतले तरी मेहनत व बुद्धिमत्तेवर आपल्याला यश मिळविता येते तिने दाखवून दिले.

धनश्रीला मिळालेल्या यशाबद्दल रातोळीच्या सरपंच कमलबाई शिवराज पाटील, माधुरी संदीप पाटील, अंजली अंकुश पाटील, मनीषा विनोद पाटील, शिवकांता मनोहर पाटील, ताराबाई सुभाष पाटील, अंजना बाई रामचंद्र पाटील, ललिताबाई व्यंकराव पांचाळ यांच्यासह ग्रा.पं.सदस्य, ग्रामस्थांनी तीला शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Children Hostage: रोहित आर्यने खिडक्यांना सेन्सर का लावले होते? पोलिसांनी त्याला कसा चकमा दिला?

Rohit Arya : निधी मिळण्यासाठी रोहित आर्यने पुण्यात केले होते उपोषण

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Georai News : गेवराईतील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा नळ योजना अपुर्णच

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT