file photo 
मराठवाडा

रागाच्या भरात जुन्या प्रेयसीला संपवणारा प्रियकर ताब्यात !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध तुटत असल्याचा राग मनात धरून जुन्या प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता. नऊ) रात्री ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी (ता. आठ) उघडकीस आली.

रामपुरी (ता. मानवत, जि.परभणी) येथील शिवारात ऊसतोडणारी टोळी मागील काही दिवसांपासून ऊसतोड करीत होती. काही दिवसांपूर्वी या टोळीतील एक तरुणी सकाळी दहाच्या सुमारास शौचाच्या निमित्ताने टोळीवरून गेली, ती परत आलीच नाही. टोळी सदस्यांत सदर तरुणीचे आई - वडील, भाऊ, नवरा, सासू - सासरे या सर्वांनी तिचा परिसरात शोध घेतला. परंतु, ती सापडली नाही. त्यामुळे सदर तरुणी हरवली असल्याबाबत तिच्या नातेवाइकांनी मानवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
ता. आठ फेब्रुवारी रोजी रामपुरी शिवारातील यादव यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह कुजलेल्या आवस्थेत दिसून आले. मृतदेहाचे धड अर्धवट अवस्थेत तेथे होते. मृतदेहाची साडी व चप्पल यावरून ही महिला ऊसतोड कामगारांच्या टोळीतील असून ती काही दिवसांपूर्वी हरवली असल्याचे निष्पन्न झाले. 

संशयित संजय जोंधळेला घेतले ताब्यात
घटनास्थळावर श्वान पथक, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, डॉक्टर यांना पाचारण करून घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला. शेतमालक यादव यांच्या फिर्यादीवरून महिलेचा खून करणाऱ्या आरोपीविरुद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे या संशयितास ताब्यात घेतले. ही कारवाई अतिरिक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर., उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, फौजदार किशोर नाईक, पोलिस कर्मचारी सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, संजय शेळके, अरूण पांचाळ, शंकर गायकवाड, जमीरोद्दीन फारोखी, किशोर चव्हाण, कैलास कुरवारे, युसुफ पठाण, संजय घुगे, छगन सोनवणे, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक श्री.बाचेवाड, पोलिस हवालदार बालाजी रेड्डी, राजेश आगाशे यांनी केली.

शेवटची भेट म्हणून बोलावून केला खून
मृत तरुणीचे लग्नापूर्वी संजय ऊर्फ पप्पू रमेश जोंधळे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. परंतु, नंतर तिचे लग्न झाले. लग्नानंतरही दोघांचा फोनद्वारे संपर्क सुरू होता. लग्नानंतर आपण भेटणार नाही, असे मृत महिलेने संजय जोंधळे यास सांगितले होते. याचा राग मनात ठेवून संजयने सदर तरुणीस रामपुरी शिवारात एकदा शेवटचे भेटून जा, असे सांगितले होते. ती भेटण्यास आल्यानंतर संजय जोंधळे याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला, अशी कबुली संजय जोंधळे याने पोलिस चौकशीत दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT