प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना.jpg 
मराठवाडा

जनधन खात्यातून मिळणार पाचशे रुपये

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर पुढील तीन महिने (एप्रिल, मे आणि जुन) प्रति महिना पाचशे रुपये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत जमा होणार आहे. यानुसार एप्रिल महिन्याची रक्कम गुरुवारी (ता. दोन) सर्व संबंधित बँकांकडे सरकारकडून वर्ग करण्यात आले. पहिल्या हप्त्याचे वितरण शुक्रवारी (ता. तीन) रोजी ज्या खाते क्रमांकांचा शेवट शुन्य किंवा एक ने होतो, त्या खात्यांतील रक्कम काढता येईल, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.
 
उपासमारी होवू नये यासाठी रक्कम
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी शासनाने २१ दिवसाचे लॉकडाऊन लागू केले आहे. यात हातावर पोट असणाऱ्या महिलांची उपासमार होवू नये यासाठी केंद्र शासनाने जनधन योजनेअंतर्गत जिल्ह्यात उघडण्यात आलेल्या जवळपास चार लाख महिलांच्या खात्यावर प्रत्येकी पाचशे रुपये टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याबाबत अंमलबजावणी सुरु झाली आहे. 

जिल्ह्यात चार लाख जनधन खाते
जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच इतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकेत चार लाख जनधन खाते आहेत. या महिलाच्या खात्यावर शासनाकडून गुरुवारी (ता. दोन) पैसे जमा करण्यात आले आहेत. परंतु हे पैसे काढताना महिलांना ठराविक दिवशीच बॅंकेत जाता येइल. शासनाने बॅंकेत गर्दी होवू नये यासाठी ग्राहक सेवा केंद्राची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यामुळे प्रशासनाने दिलेल्या सूचनानुसारच पैसे काढावे लागणार आहेत.

खाते क्रमांकानुसार ठरविक दिवशी मिळणार रक्कम
ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक शुन्य आणि एक आहे, अशा महिलांना शुक्रवारी (ता. तीन) पैसे काढता येतील. तसेच ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक  दोन आणि तीन अशा महिलांना ता. चार एप्रिल रोजी रक्कम काढता येइल. ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक चार आणि पाच आहे, अशा खातेदारांना ता. सात एप्रिल रोजी रक्कम काढता येइल. ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक सहा आणि सात आहे, अशा खातेदारांना ता. आठ एप्रिल रोजी रक्कम काढता येइल तर ज्यांच्या खात्याचा शेवटचा क्रमांक आठ आणि नऊ आहे अशा महिलांनी ता. नऊ एप्रिल रोजी संबंधीत बॅंकेतून पैसे काढावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक गणेश पाठारे यांनी केले आहे.

खातेदारांनी सुचनांचे पालन करावे
संबंधित पात्र लाभार्थ्यांनी बँक खात्यावरून पैसे काढण्याकरता बँक ग्राहक सेवा केंद्र अथवा एटीएमचा वापर करावा. तसेच येताना कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनेतंर्गत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.
जे लाभार्थी वरील तारखेला येणार नाहीत त्यांना ता. १५ एप्रिल नंतर कधीही पैसे काढता येतील, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेकडून दिवाळीचा धमाका! उत्सवकाळात सोडणार तब्बल १,१२६ विशेष गाड्या, पाहा वेळापत्रक

iPhone 17 Order : आयफोन घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरबसल्या 10 मिनिटात मिळवा iPhone 17, 'ही' आहे सोपी ट्रिक

Dhananjay Munde: ''ओबीसींचा कट-ऑफ बघा अन् EWSचा बघा...'', धनंजय मुंडे मराठा आरक्षणावर बोलले

Viral Video : सचिन तेंडुलकरचं विमान वादळात अडकलं, हिंसक प्राणी असलेल्या जंगलात करावी लागली एमर्जन्सी लँडिंग

Income Tax Notice: खबरदार! मित्रांचं बिल भरण्यासाठी तुमचं क्रेडिट कार्ड वापरताय? तर आयकर विभाग कारवाई करणार

SCROLL FOR NEXT