file photo 
मराठवाडा

‘पेट्रोलिंग’ करताना पकडला पाच लाखाचा गुटखा !

सकाळ वृत्तसेवा

परभणी : राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची चोरटी वाहतुक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने शनिवारी (ता.१४) ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून ४ लाख ९५ हजार रुपयांचा गुटख्यासह एक पिकअप वाहन व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

परभणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पाथरी रस्त्यावर सापळा लावून एक वाहन (क्रमांक एम. एच. २२ ए. ए. १७४१) महिंद्रा पिकअप वाहनास ताब्यात घेवून वाहनाची तपासणी केली. या वाहनात मोठ्या प्रमाणात गुटखा असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली. या वाहनात सय्यद तौहीद पिता सय्यद रफिक (वय २४, रा. भोई गल्ली, गांधी पार्क, परभणी) व शुभम मारोती तावडे (वय २०, वाहनचालक) अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून वाहन ताब्यता घेतले. 

साहित्य मिळून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त 
वाहनातून प्रियियम राजनिवास सुंगधीत पान मसाला १५ बोरे प्रत्येक बोऱ्यामध्ये ४ थैल्या यात राजनिवास पानमसाल्याचे ५० पुडे असे एकूण ३ हजार पुडे, जी. पी. १ जाफरानी जर्दा १५ बोरे, प्रत्येक बोऱ्यामध्ये ४ थैल्या प्रत्येक थैलीत ५० जर्दाचे पुडे असे एकूण ३ हजार पुडे, एक पांढऱ्या रंगाचे महिंद्रा पिकअप वाहन, एक अॅपल कंपनीचा मोबाईल, एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे. या कारवाईत गुटखा ४ लाख ९५ हजार व इतर साहित्य मिळून ८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यता आला आहे.

आरोपीविरुध्द गुन्हा दाखल
 या प्रकरणी अन्नभेसळ अधिकारी श्री.कच्छवे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरुध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई अन्नभेसळ अधिकारी श्री.कच्छवे, पोलिस कर्मचारी हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसुंदरे, मधुकर पवार, शरद मुलगीर, शिवा धुळगुंडे, किशोर चव्हाण, संजय घुगे यांनी केली.


 अधिक माहिती लवकरच हाती
या आरोपींनी हा गुटखा कुठून आणला व तो कुठे घेवून जात होते याची माहिती पोलिस घेत आहेत. याची माहिती लवकर हाती येईल.
- प्रवीण मोरे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT