dhrmabad.jpg 
मराठवाडा

कोरोना लढ्यासाठी पाच लाखांची मदत

सुरेश घाळे


धर्माबाद, (जि. नांदेड) ः राष्ट्रीय आपत्ती असो, वा धार्मिक, सामाजिक कार्य, प्रत्येकवेळी आपल्या दातृत्त्वाचा परिचय देणाऱ्या धर्माबादच्या काकाणी परिवाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व पंतप्रधान सहायता निधीसाठी प्रत्येकी अडीच लाख रुपये याप्रमाणे पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश काकाणी परिवाराने आपल्या निवासस्थानी मंगळवारी (ता. १४) सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सुपूर्द केला.


भारतीयांना हाक
महिन्याभरापासून ‘कोरोना’ विषानूचा कहर रोखण्यासाठी राज्याच्या अर्थव्यवस्थेला जणू टाळे लागले आहे. देशभरातील उद्योगधंदे बंद असल्याने केंद्र व राज्य सरकारकडे जमा होणारी कररूपी रक्कम बंद झाली आहे. अशा अवस्थेत देशात व राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागल्याने तपासणी, उपचार यावर खर्च करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज निर्माण झाली आहे. देशासह राज्यातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने शासनाच्या तिजोरीवरही मर्यादा आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहायता निधी, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भारतीयांना हाक दिली होती. त्याला धर्माबादेतील काकाणी परिवाराने साथ दिली.

लॉकडाऊन संपेपर्यंत खिचडी वाटप
तसेच लॉकडाऊन काळात उद्योजक सुबोध काकाणी यांनी शहरातील विविध ठिकाणी राहात असलेल्या गोरगरीब जनतेसाठी दररोज दोन हजार लोकांना तांदळाची खिचडी करून आपल्या वाहनातून घरपोच खिचडीची पाकिटे वाटप करीत असून लॉकडाऊन संपेपर्यंत खिचडी वाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान अशा अनेक प्रकारे विविध ठिकाणी मदतीचा हात देत कोरोना विरोधातील राष्ट्रीय व स्थानिक लढ्यात धर्माबादेतून आपण आघाडीवर असल्याचे दाखवून दिले आहे. काकाणी परिवार राष्ट्रीय आपत्तीतच नव्हे, तर कायमच सामाजिक भान जपत आले आहे. कोरोना संकटात काकाणी परिवाराने दाखविलेल्या या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनाच्या रुपाने देशावर मोठे संकट उभे राहीले आहे. अशा वेळी शासन आणि प्रशासनासोबत उभे राहून या महामारीचा सामना करणेे आवश्यक आहे. देशातील उद्योगधंदे ठप्प असल्याने शासन पातळीवर निधीची कमतरता भासू नये यासाठी देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना काकाणी परिवाराने मंगळवारी सायंकाळी प्रत्येकी अडीच लाख रुपयांप्रमाणे एकूण पाच लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे सोपविला आहे. या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार दत्तात्रय शिंदे, डॉ. कमलकिशोर काकाणी, ओमप्रकाश काकाणी, पुरुषोत्तम काकाणी, उद्योजक सुबोध काकाणी यांच्यासह काकाणी परिवार उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT