file photo
file photo 
मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हयात आणखी पाच कोरोना पॉझिटीव्ह

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आणची पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच उपचार सुरु असलेल्या दोन रुग्णांचे दुसरे अहवालही पॉझिटिव्ह आले असून, कोरोना रुग्णांबाबत जिल्ह्याची वाटचाल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोचली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दररोज किमान पाच ते आठ रुग्ण बाधित असल्याचे अहवाल प्राप्त होत आहेत. प्रलंबित अकरापैकी सात जणांचे स्वॅब अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या उपचार घेणाऱ्या दोन कोरोनाबाधीत रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, उर्वरित चारपैकी दोघांचे अहवाल प्रलंबित, तर दोघांचे अनिर्णित आहेत. 

कुठले आहेत रुग्ण? 
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तुळजापूर तालुक्यातील तीन, लोहारा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. हे सर्व मुंबई, पुण्याहून आलेले अथवा त्यांच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी दुसऱ्यांदा पाठविण्यात आले होते.

दोघांचेही दुसरे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील तिघे पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण मुंबईवरून आलेले आहेत. तर उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील रुग्णाच्या संपर्कात आलेला एक, तसेच उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील एक अकरा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर या मुलाची मावशी यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. हे सर्वजण मुंबईवरून आलेले आहेत. 

बाधीत संपर्कातील अथवा मुंबई, पुणे रिटर्न 
जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे रुग्ण आढळून आले आहेत ते सर्व मुंबई-पुणे येथून आलेले आहेत. अथवा त्याच रुग्णांसोबत मुंबई पुण्याहून आलेले अथवा त्यांच्या घरातील व्यक्ती बाधित होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज सात ते दहा दरम्यान वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT