औंढा नागनाथ ः नागनाथ मंदिरात होणाऱ्या रथोत्‍सवाच्या कार्यक्रमात सजविण्यात आलेला रथ. 
मराठवाडा

नागनाथ मंदिराला रथाच्या पाच प्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ ः येथील नागनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी (ता. २५) रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी हजारो भाविकांची उपस्थिती राहणार असून त्‍याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे. नागनाथ संस्थानचे कर्मचारी हा रथ ओढणार असून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत.

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. मंगळवार रात्री दहा वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी नागनाथ संस्थानचे कर्मचारी हा रथ ओढणार असून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत.

असा राहणार पोलिस बंदोबस्त
या वेळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक अब्दुल गणी, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यासह दोन पोलिस उपाधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, तेरा पोलिस उपनिरीक्षक, शंभर पोलिस कर्मचारी जवान तैनात केले जाणार आहेत. तसेच एलसीबी पथक, एटीसी पथक, बीडीडीएस पथक, आरसीपी पथक, एसआरपीएफ पथक मंदिरामध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक वैजेनाथ मुंढे यांनी दिली.

रथाची पाहणी व तपासणी
रथोत्‍सवात सजविण्यात आलेल्या रथाची पाहणी व तपासणी करण्यात आली. या वेळी संस्थानचे विश्वस्त गणेश देशमुख, सहसचिव विद्या पवार, डॉ. विलास खरात, शिवाजीराव देशपांडे, गजानन वाखरकर, डॉ. पुरुषोत्तम देव, पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडेंसह विशेष पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक बाबासाहेब खार्डे, माणिक डुकरे, माधव भडके, प्रवीण बांगर, संदीप गायकवाड, भास्कर माने, विष्णू पोले, तुकाराम जाधव तसेच देवस्थानचे व्यवस्थापक शंकर काळे, सुतार रामदास शेगूकर, लोहार राजू तामसकर, वैजनाथ पवार आदींची उपस्थिती होती. रथोत्सवाच्या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होणार असल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. महाशिवरात्र यात्रा महोत्सवानिमित्त नगर पंचायततर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता कुस्ती स्पर्धा होतील. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार १११ रुपये, तृतीय पारितोषिक एक हजार १११ रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. कुस्ती स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन नगर पंचायत प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

काल्याच्या कीर्तनाने सांगता
अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्र उत्सवाची सांगता बुधवारी (ता. २६) होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्यासह विश्वस्त सल्लागार व विश्वस्तांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT