raosaheb-danve 
मराठवाडा

दानवेंच्या कार्यालयाची झडती पोलिसांना भोवली, पाच जण निलंबित

उमेश वाघमारे

काही संशयित हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात असल्याची माहिती जाफराबाद पोलिसांनी मिळाली. मात्र, यासंदर्भात कोणाताही गुन्हा दाखल नसताना, वरिष्ठांना माहिती न देता पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली.

जालना : वाळूमाफियांच्या शोधात पोलिसांनी विनापरवानगी केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे Union Minister For State Raosaheb Danve यांच्या जाफराबाद Jafrabad येथील संपर्क कार्यालयाची झडती घेतल्या प्रकरणी दोन पोलिस अधिकारी, तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख SP Vinayak Deshmukh यांनी सोमवारी (ता.१४) ही Jalna कारवाई केली. जाफराबाद येथे एका पत्रकारावर वाळूमाफियांनी हल्ला केला. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताचा शोध सुरु केला. काही संशयित हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात असल्याची माहिती जाफराबाद पोलिसांनी मिळाली. मात्र, यासंदर्भात कोणाताही गुन्हा दाखल नसताना, वरिष्ठांना माहिती न देता पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्या जाफराबाद येथील संपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतली. या संदर्भात दानवे यांनी पोलिस अधीक्षक देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. संपर्क कार्यालयाची झडती का घेतली, त्यातून काही निष्पन्न झाले? या बेकादेशीर कारवाईमुळे बदनामी होत असून या प्रकाराची चौकशी करून संबधितांवर तत्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली होती. Five Police Personnel Suspended For Checking Raosaheb Danve's Office

गुन्हा दाखल नसताना, पूर्व परवानगी न घेता पोलिसांनी कारवाई केल्याची बाब चौकशी दरम्यान पुढे आली. बेकायदेशीर वर्तन केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नितीन काकरवाल, उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलिस कर्मचारी मंगलसिंग सोळंके, सचिन तिडके, शाबान तडवी यांना आज निलंबित करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT