हिंगोली तपासणी 
मराठवाडा

हिंगोलीत विनाकारण फिरणाऱ्या १०४ जणांच्या तपासणीत पाच पॅाझिटीव्ह

शहरालगत असलेल्या अकोला बायपास येथील शिवनेरी चौकात शनिवारी (ता. २४ ) दुपारी एक वाजेपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या १०४ नागरिकांची अँन्टीजेन तपासणी करण्यात आली असून यात पाच जण पॅाझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

राजेश दार्वेकर

हिंगोली : शहरालगत असलेल्या अकोला बायपास येथील शिवनेरी चौकात शनिवारी (ता. २४ ) दुपारी एक वाजेपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या १०४ नागरिकांची अँन्टीजेन तपासणी करण्यात आली असून यात पाच जण पॅाझिटीव्ह आढळून आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्ह्यात कडक संचारबंदीचे आदेश असताना काहीजण जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाला धुडकावून विनाकारण दुचाकीवर फिरत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी बळसोंड ग्रामपंचायत व ग्रामीण पोलिस विभागाकडून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १०४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामधे पाच जण बाधित आढळून आले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा - माहूरात पुन्हा एका बिबट्याचा विष प्रयोगाने मृत्यू; नांदेडमधील खळबळ उडविणारी घटना (video)

येथील पोलिस निरीक्षक बळीराम बंधखडखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे, श्री. ठोके, श्री. पोले, श्री. धामणे यांच्यासह संपूर्ण ग्रामीण पोलिस यंत्रणा भर रस्त्यावर उतरुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवून कोरोना चाचणीसाठी पुढाकार घेत होते. यावेळी सरपंच शैलेश जयस्वाल, पप्पू चव्हाण, ग्रामसेवक राजेश किलचे, सुमेध घिके आदींची उपस्थिती होती. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे सहाय्यक पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी अँटीजेन तपासणी कॅम्पला भेटी दिल्या.

दरम्यान, अकोला बायपास परिसरात विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांना रविवार पासून ग्रामपंचायत, पोलिस विभागाकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक राजेश किलचे यांनी सांगीतले. तपासणीसाठी डॉ. शेख नावेद, सय्यद इम्रान अली, स्वाती कांबळे, प्रवीण भालेराव, ओम जाधव यांचा सहभाग होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT