धामणा नदीच्या पुलावरुन पाणी 
मराठवाडा

दुथडी वाहणाऱ्या धामनाला पूर 

गजानन उदावंत

जाफराबाद (जि.जालना) -  शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सारखा सुरू आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १७) तालुक्यातील नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याचे चित्र होते.

जालना जिल्ह्यातील धामना नदीला आलेल्या पुराने बोरगाव, बोरी, हिवराबळी गावांना वेढा घातला. बोरगाव आणि बोरीच्या ३५ कुटुंबांना शाळेत हलविण्यात आले आहे. माहोरा-कोल्हापूर रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने आणि पिंपळखुट्याजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद होती. दरम्यान, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, नायब तहसीलदार केशव डकले यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. 

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पूर्णा, केळणा आणि धामना नद्यांना पूर आले. बोरगाव बुद्रुक गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. पिंपळखुट्याजवळील धामना नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने विदर्भाकडे जाणारी वाहतूक बंद होती. सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि धामनाकाठच्या गावाच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने मका, सोयाबीन, कपाशी, मिरची, मूग, उडीद, अद्रक, हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

धामनाकाठची गावे बोरगाव बुद्रुक, बोरी खुर्द, बोरगाव मठ, पिंपळखुटा, विरखेडा भालकी, मेरखेडा, हिवराबळी, देऊळगाव उगले, निमखेडा बुद्रुक, देऊळझरी, बोरखेडी चिंच, कुंभारझरी, ब्रह्मपुरी, आळंद, हनुमंतखेडा या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

३५ कुटुंबांना शाळेत हलविले 

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धामना व पूर्णा दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे हिवराबळी, बोरगाव व बोरी गावात पाणी शिरले आहे. बोरगाव येथील २० कुटुंबे व बोरी येथील १५ कुटुंबांना शाळेत हलविण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी स्वामी यांनी सांगितले. 

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी 

जाफराबाद तालुक्यातील बोरगाव, बोरी, हिवराबळीसह अन्य गावांत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे; 
तसेच सततच्या पावसामुळे देखील जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने झालेल्या 
नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश गवळी यांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT