फोटो 
मराठवाडा

नांदेडात पोलिसांच्या पथसंचलनावर पुष्पवृष्टी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मागील दोन महिण्यापासून रस्त्यावर उतरून चोख बंदोबस्त देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मंगळवारी (ता. २८) गाडीपुऱा परिसरात नागरिकांनी  पुष्पवृष्टीने स्वागत केले. पथसंचलन करणाऱ्या पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अक्षरशः पुष्पवृष्टी करण्यात आली. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी गाडीपुऱ्यातील नागरिकांकडून करण्यात आलेल्या या स्वागताने पोलिस कर्मचारीही भाऊक झाले होते. 

संबंध देशासह राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. मुंबईत कोरोनाने कर्तव्य बजावणाऱ्या तीन पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे कोरोनाने बळी घेतल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचे काही अंशी मनोबल खचले असल्याची चर्चा होती. अनेक ठिकाणी पोलिसांना कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले. तरीही स्वतः ची, घरादाराची व कुटुंबियातील सदस्यांची तमा न बाळगता पोलिस कर्मचारी अधिकारी बंदोबस्तावर तैनात आहेत. रखरखत्या व तळपत्या उन्हात घामाच्या धारा गाळत बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आज गाडीपुऱ्यातील नागरिकांनी पथसंचलन सुरू असताना प्रत्येक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली. 

नागरिकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे औक्षण

सामाजिक अंतराचे भान जपत गाडीपुऱ्यातील नागरिकांकडून पोलीस कर्मचाऱ्यांचे यावेळी औक्षण करण्यात आले. इतवारा उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा) धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह पथसंचलनात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. गाडीपुऱ्यात पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांचे कुंकुम लावून त्यांचे औक्षण करण्यात आले. चिमुकल्या बालिकेनेही पोलीस कर्मचाऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुलाबपुष्प दिले. 

चिमुरडीच्या नाकावर मास्क 

पोलीस अधीक्षक धनंजय पाटील यांनी त्या चिमुकलीच्या हस्ते गुलाबपुष्प स्वीकारले. यावेळी चिमुकलीच्या नाकावर मास्क बांधलेला पाहून पोलीस उपाधीक्षक पाटील यांनी समाधान व्यक्त केले. खाकीचा रुबाब आणि धाक पाहिलेल्या नागरिकांनी आज खाकीचा केलेला आगळा वेगळा सन्मान पाहून पोलिस कर्मचारी आणि अधिकारीही अक्षरशः भावूक झाले होते. पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने मानसिक बळ देण्याचे काम आजच्या पुष्पवृष्टीतून झाले आहे. 

पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले 

प्रत्येक नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने दिलेल्या प्रत्येक नियमांचे तंतोतंत पालन करावे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरितीने पार पडल्यास निश्चितपणे आपण या संकटावर मात करू शकतो. असे सांगतानाच गाडीपुऱ्यातील नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर केलेल्या पुष्पवृष्टीने निश्चितपणे आमचे मनोबल वाढले आहे. आपण सर्वजण मिळून कोरोनाच्या संसर्गावर मात करू असा विश्वासही धनंजय पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: आईचं मुलीच्या प्रियकरावर प्रेम जडले, एकत्र राहण्यासाठी मास्टरप्लॅन आखला, पण नंतर जे घडले त्याने सगळेच हादरले

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा; ८५०० कोटींची देणार भेट, यंत्रणा तैनात पण अधिकृत घोषणा नाही

Latest Marathi News Updates Live : साडेतीनशे एकर जागेवरील कांदळवन केले नष्ट

Mumbai: ७५ प्रवासी असणाऱ्या विमानाचं चाक हवेतच निखळलं अन्...; मुंबई विमानतळावर धक्कादायक घटना

Mangalwedha News : सोलापूर जि. प. अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव, मंगळवेढ्यातील हालचालीना गती

SCROLL FOR NEXT