अर्भक सापडले. 
मराठवाडा

कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर अर्भक आढळल्याने माजलगावमध्ये उडाली खळबळ

घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून अर्भक माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.

कमलेश जाब्रास

माजलगाव (जि.बीड) : शहरातील बसस्थानकाच्या स्वच्छतागृहाच्या परिसरात एक मृत अर्भक आज सोमवारी (ता.२५) सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून अर्भक माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. येथील बसस्थानकाच्या परिसरामध्ये (Beed) कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोमवारी सकाळी एक मृत अर्भक आढळून आले. याची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भक ताब्यात घेत माजलगाव (Majalgaon) ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हे समजू शकले नाही.

5 ते 6 महिन्यांचे हे अर्भक असल्याची माहिती आहे. अर्भक कुणाचे आहे? कुणी फेकले आदी तपास शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, अविनाश राठोड, पोलिस जमादार तोटेवाड, ठेंगल, चालक श्रीमंत पवार, महिला कर्मचारी मिना काळे या पुढील तपास करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News :दीक्षाभूमी विकासाच्या संथ गतीवर उच्च न्यायालयाचा संताप; आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

Satara Rare Softshell Turtle : निसर्गाची किमया! साताऱ्यात आढळले मऊ पाठीचे आणि लांब मानेचे दुर्मीळ कासव; वाघाप्रमाणं मिळतंय कायदेशीर संरक्षण, वैशिष्ट्ये काय?

MPSC Success Story: आईने खानावळ चालवली, वडील माथाडी कामगार; लेकीने MPSCत गाजवले नाव, विशाखा शिर्केंची प्रेरणादायी यशोगाथा

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

SCROLL FOR NEXT