अग्रवाल इंडस्ट्रिजमधील पाण्याच्या बाटल्यांचे खोके सिल करताना पथकातील अधिकारी. 
मराठवाडा

‘एमआयडीसी’तील कारखान्यावर छापा

सकाळ वृत्तसेवा

परभणी : विनापरवाना सुरू असलेल्या एका ड्रिंकिंग वॉटर कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासनाच्या पथकाने बुधवारी (ता. एक) सकाळी अचानक छापा मारला. या ठिकाणी विक्रीसाठी तयार करून ठेवण्यात आलेला चार लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केलेल्या या कारवाईने शहरातील इतर विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

परभणी शहरात विनापरवाना अनेक व्यवसाय सुरू आहेत. त्यात खाद्यपदार्थांची दुकाने व मोठ-मोठे कारखाने आहेत. या संदर्भात अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शहरात तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत बुधवारी (ता.एक) शहरातील औद्योगिक परिसरात रिट आणि नॅनो या नावाच्या पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या अग्रवाल इंडस्ट्रीजच्या कारखान्यात या पथकाने सकाळी अचानक छापा मारला.

चार लाख ८५ हजारांचा माल जप्त
 या वेळी कारखान्यात पाण्याच्या बाटल्यांनी भरलेले अनेक खोके या पथकाला सापडले. या पथकाने या खोक्यातील पाण्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता या दोन बाटल्यांपैकी एकावर विक्री परवाना व दुसऱ्यावर मुदत संपलेल्या परवाण्याचा नंबर छापण्यात आलेला होता. त्यामुळे तातडीने या पथकातील अधिकाऱ्यांनी या कारखान्यातील चार लाख ८५ हजार ४६६ रुपयांचा माल जप्त केला. हा कारखाना विनापरवाना चालत असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई औरंगाबाद विभागाचे सहआयुक्त श्री. वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) नारायण सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कच्छवे व अरुण तमडवार यांनी केली. या कारवाईस राजू पेदापल्ली व श्री. लोंढे यांचे सहकार्य लाभले.


पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले
सदर अन्नपदार्थावर अन्न परवान्याचा उल्लेख नसल्याने अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. ते औरंगाबाद येथील अन्न तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. कारखान्यातील उर्वरित पाण्याच्या बंद बाटल्यांचा साठा जप्त करून अन्न व्यावसायिकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारखान्याला तत्काळ व्यवसाय करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश देण्यात आले.

 


अशी झाली कारवाई
शहरात अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे हे तपासणीसाठी फिरत असताना त्यांना नॅनो नावाची पाण्याची बंद बाटली निदर्शनास आली. त्यांनी या बाटलीवरील परवान्याची ऑनलाइन तपासणी केली असता या कंपनीचा परवाना ऑगस्ट २०१९ मध्येच संपला असल्याचे समोर आले. त्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली.

मोहीम सुरू राहणार 
या प्रकरणात अग्रवाल इंडस्ट्रीज दोषी आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. भविष्यातही अशीच मोहीम सुरू राहणार असून अन्न उत्पादन करून विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी अन्न परवाने तातडीने काढून घ्यावेत.
- नारायण सरकटे, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, परभणी

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

SCROLL FOR NEXT